बिनशेती ( अकृषिक) ना हरकत दाखला देणे (रहिवास/ वाणिज्य/ औद्योगिक)
नियमावली :- शासन निर्णय क्रमांक आर बी डी/1081/871/ रस्ते-7/ दिनांक 09/03/2009
आवश्यक कागदपत्रे
प्रांत अधिकारी यांचे पत्र (रहिवास/ वाणिज्य/ औद्योगिक)
7/12 उतारा 3 महिन्याच्या आतील तारखेचा
गाव नकाशा गट नंबर सर्वे नंबर दर्शविलेला (रंगाने दर्शविण्यात यावा)
तालुका भूमापन अधिकारी यांचा मोजणी नकाशा
ले आऊट प्लॅन व त्यावर आर्किटेक्ट, जमीन मालक यांच्या स्वाक्षऱ्या
7/12 उताऱ्यावर 1 पेक्षा अधिक नावे असल्यास त्याबाबतचे संमती पत्र व टीएलआर नकाशावर त्यांच्या स्वाक्षरी तसेच उपअभियंता यांची सही
कार्यपद्धती
वरील कागदपत्रांची पूर्तता झालेली असल्यास प्रकरण उपविभागाकडे पाठवावे
वरील कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्यास प्रकरण जेथून प्राप्त झाले त्यांना अपूर्ण कागदपत्राचे पूर्ततेसाठी मूळ प्रतीसह पाठविण्यात यावे व आपले कार्य विवरण नोंदवही मध्ये त्याबाबत सद्यस्थितीमध्ये कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत प्रकरण निकाली काढण्यात येत आहे अशी नोंद घ्यावी व तसेच पत्रात नमूद करून कळविण्यात यावे.
उपविभागाकडून तपासणी करून प्राप्त प्रकरणांची विभागीय स्तरावर तपासणी
रस्त्याचे मध्यापासून जागेचे अंतर स्केल प्रमाणे तपासणी करावी
सदरील नकाशा उपभियंता यांचा शेरा/ रहिवास/ वाणिज्य कारणासाठी अंतरे दर्शविले आहे व त्याचे खाली त्यांची स्वाक्षरी
उपविभागाकडून ना हरकत दाखला द्यावा किंवा नाही याबाबतचा स्पष्ट खुलासा पत्रात नमूद करण्यात यावा
कार्यकारी अभियंता यांचे दोऱ्याच्या वेळी सदर जागा गट नंबर/ सर्वे नंबर/ प्रत्यक्ष दाखवलेली असावी, त्याशिवाय प्रकरण विभागीय कार्यालयास सादर करू नये विलंबा बाबतची जबाबदारी उपविभागीय अभियंता यांची राहील
वरील बाबींची पूर्तता झाल्यावर अंतिम मंजुरीसाठी सादर करावे
नकाशावर Only for N.A. असा शिक्का मारण्यात यावा
त्यानंतर प्रांत यांच्या संदर्भ पत्रांमुळे प्रकरणाचा अहवाल देण्यात यावा व प्रकरण न हरकत दाखला दिला यांना तिला फाईल करावे व कार्य विवरण नोंदवहीत नोंद घ्यावी.
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know