Procedure to obtain Permission from PWD for Petrol pump Construction and Storage
नियमावली :- शासन निर्णय क्रमांक आर बी डी/1081/871/ रस्ते-7/ दिनांक 09/03/2009
आवश्यक कागदपत्रे
जिल्हादंडाधिकारी नाशिक यांचे पत्र
जागा बिनशेती प्रांत यांची ऑर्डर असावी
जागेचा लेआउट
प्रत्यक्ष जागेवर पेट्रोल पंप बांधकाम नकाशा
गाव नकाशा
Key Map 100 मीटर त्रिजेचा
ग्रामपंचायत दाखला
कंपनी करारपत्र
जागा दुसऱ्याची असल्यास त्याचे संमती पत्र शंभर रुपये बोंड वर
7/12 उतारा 3 महिन्याचे आतील
TLR नकाशा तालुका भूमापन अधिकारी ( मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचे परिपत्रक प्रमाणे कार्यवाही करावी)
कार्यपद्धती
वरील सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यावर प्रकरण उपविभागात तपासणीसाठी पाठवावे.
उपविभागाकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून व गाव नकाशा तसेच बांधकाम नकाशा अथवा लेआउट वर इमारत रेषा वाणिज्यकारणास्तव असा उल्लेख करून व ना हरकत दाखला द्यावा किंवा नाही याचा स्पष्ट अहवाल देण्यात यावा कार्यकारी अभियंता यांची जागा तपासणी घ्यावी.
वरील कागदपत्रे प्राप्त व तपासणीनंतर कार्यकारी अभियंता यांनी मंजुरी घेऊन जिल्हा दंडाधिकारी यांना अहवाल सादर करणे बाबतचे पत्र द्यावे.
भूमिगत साठा पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी परवानगी देणे.
नियमावली :- शासन निर्णय क्रमांक आर बी डी/1081/871/ रस्ते-7/ दिनांक 09/03/2009
आवश्यक कागदपत्रे
पेट्रोल पंप मालक अथवा कंपनीचा बांधकामाकरिता परवानगी मिळणे बाबतचा अर्ज
7/12 उतारा
जोड रस्ता प्रस्ताव रुपये पाच लक्ष बँक गॅरंटीसह सहा प्रतीत
अथवा जोड रस्ता IRC 12:1987 नुसार जोड रस्ता बांधण्यात आला असल्याबाबतचे उपविभागीय अभियंता यांचे प्रमाणपत्र स्वाक्षरीसह सादर करणे
बांधकामाचा नकाशा, जिल्हाधिकारी यांचा ना हरकत दाखला
जागेचा लेआउट प्लॅन
Key Map 100 मीटर त्रिजेचा
जागा दुसऱ्याची असल्यास त्याचे संमती पत्र शंभर रुपये बोंड वर
गाव नकाशा
ग्रामपंचायत अथवा सक्षम यंत्रणेचा बांधकामा बाबतची परवानगी मंजुरी पत्र
कार्यपद्धती
वरील सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यावर प्रकरण उपविभागात तपासणीसाठी पाठवावे.
उपविभागाकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून व नकाशावर वाणिज्य कारणासाठी बांधकाम रेषा दाखविण्यात यावी व बांधकाम करणेबाबत उपविभाग आणि परवानगी द्यावी किंवा कसे याचा स्पष्ट उल्लेख अहवालात करण्यात यावा.
वरील कागदपत्र आणि अहवाल प्राप्त झाल्यावर कार्यकारी अभियंता यांनी मंजुरीनंतर बांधकाम परवानगीचे पत्र संबंधितांना द्यावे
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know