सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी
सेवापुस्तक हे अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. हा अभिलेख 'अ' वर्गात मोडत असल्याने तो प्रदिर्घ कालावधी पर्यंत जतन करुन ठेवणे व सुस्थितीत ठेवणे ही त्या संबंधित कार्यालयाची जबाबदारी आहे. सेवापुस्तक अपूर्ण असेल/ काही आक्षेप असतील तर संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात. तरी सेवापुस्तकास आक्षेपच लागू नयेत या करीता खालील बाबींची पूर्तता कर्मचारी सेवेत कार्यरत असतांनाच करुन घेण्याची कार्यवाही कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने सेवापुस्तकात खालील बाबींच्या नोंदी असणे आवश्यक आहे.
अ) प्रथम नियुक्तीचा तपशिल
१. शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक
२.कार्यालयाचे नाव व पदनाम
३.प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत
४. वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद
५. वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सेवापुस्तकास जोडलेले असावे
६. चारित्र्य पडताळणीची नोंद
७. प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख / पडताळणी केली आहे काय ?
८.जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद
९. स्वग्राम जाहीर केल्याची नोंद
१०. सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद
११. परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद
१२. विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
१३. विवाहानंतरच्या नांव बदलाबाबतची नोंद
१४. संगणक परीक्षा उत्तीर्ण (एमएससीआयटी व इतर)
१५. संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण
१६. मराठी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश
१७. हिंदी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश
१८. प्रथम पानावरील प्रत्येक पाच वर्षांनी सेवा प्रमाणित केली आहे का ?
१९. पाठीमागील पानावरील सेवा प्रमाणित आहे काय?
२०. वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन केल्याबाबतची नोंद
२१. वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदत पूर्व सेवानिवृत्त केले असल्यास त्याबाबतची नोंद
२२. सेवाअंतर्गत प्रशिक्षण नोंद
२३. वार्षिक वेतनवाढ मंजुरी नंतर रकाना क्रमांक ८ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी
२४. मानीव दिनांक नोंद
२५. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. ८९२८/२०१५ दिनांक ०६/०७/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या सूचना शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१९ व ०५/१०/२०२० च्या अंमलबजावणी बाबतची नोंद
ब) नामनिर्देशनाच्या नोंदी
१. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद
२. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) खाते क्रमांकाची नोंद
३. भविष्य निर्वाह निधीचे नामनिर्देशन पत्र नोंद
४. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) नामनिर्देशन पत्र नोंद
५. कुटूंब निवृत्तीवेतन नामनिर्देशन पत्र नोंद
६. सेवा उपदानाचे नामनिर्देशन पत्राची सेवापुस्तकात नोंद
७. कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाची अद्ययावत नोंद
८. अद्ययावत कुटूंबाचे प्रमाणपत्र
९. त्याबाबतची विवाहानंतर अथवा अन्य काही कारणाने नामनिर्देशन बदलले असल्यास अद्ययावत नोंद
क) गट विमा योजना तपशिल
१. गट विमा योजना १८८२ चे सभासद झाल्याची आदेशाची नोंद
२. गट विमा योजना १८८२ चे नामनिर्देशन पत्राची नोंद
३. गट विमा योजना वर्गणी (०१/०५/१९८२)
४. गट विमा योजना वर्गणी (०१/०१/१९९०)
५. गट विमा योजना वर्गणी (०१/०१/१९९८)
६. गट विमा योजना वर्गणी (०१/०९/२०१०)
७. गट विमा योजना वर्गणी (०१/०२/२०१६)
८. पदोन्नतीनंतर वाढीव गटविमा योजनाची नोंद (दिनांक व रक्कम)
९. विवाहा नंतर अथवा अन्य काही कारणा ने नामनिर्देशन बदलले असल्यास त्याबाबतची अद्ययावत नोंद
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know