कामाचे नाव :-
तांत्रिक मंजुरी
कार्यालयीन आदेश :-
उपनिर्दिष्ट काम मार्च 2022 अर्थसंकल्प (बिगर आदिवासी) अंतर्गत मंजुर आहे.
कार्यक्रमास मान्यता देतांना या कामाची अंदाजीत किंमत रु. 250 लक्ष इतकी अपेक्षीत होती.
या कामास सन 2018-19 साठी रुपये «कामांची_एकुण_वार्षिक_किंमत_रुलक्ष» लक्ष एवढी तरतुद उपलब्ध आहे.
कार्यकारी अभियंता, यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची छाननी करुन त्यात योग्य त्यादुरुत्या करुन सदरच्या कामास रुपये 18000000/-(अक्षरी रुपये एक कोटी ऐंशी लाख फक्त फक्त) रक्कमेस तांत्रिक मंजुरी देऊन तयाची नोंद या कार्यालयाचे रजि.मध्ये प्रशा-1/मुळ कामे/ /सन 2018-19 क्रमांकान्वये केलेली आहे. तसेच रु. ________/-इतक्या रक्कमेची जी.एस.टी. साठी वेगळी तरतुद ठेवण्यात आली आहे.
तांत्रिक मान्यता प्राप्त अंदाजपत्रकातील कामाची व्याप्ती पुढील प्रमाणे आहे.
पावसाळयात व पावसाळयानंतर खड्डे BUSG ने भरणे.
प्रस्तावित लांबीतील ठिकठिकाणी खचलेल्या भागात 75 मीमी जाडीचा व 5.50 मी रुंदीस BUSG ने मजबुतीकरण करणे.
50 मीमी जाडीचा 5.50 मी रुंदीस बीएम करणे.
20 मीमी जाडीचा 5.50 मी रुंदीस कारपेट सिलकोटसह करणे.
कठीण मुरुमाने बाजु पट्या भरणे.
आवश्यक त्या ठिकाणी गटारी खोदणे.
माहितीफलक बसविणे.
इतर आवश्यक बाबी.
सदर अंदाजपत्रकासाठी सन 2022-23 ची राज्यस्तरीय दरसुची वापरण्यात आलेली आहे.
सदर कामावरील खर्च हा 5054 मार्ग व पुल यावरील भांडवली खर्च 03 राज्य मार्ग, 800 व इतर खर्च या लेखाशिर्षाखाली खर्च घालण्यात यावा.
प्रस्तुत काम करतांना पुढील बाबींची पुर्तता करण्यात यावी या अटीवरच ही तांत्रिक मान्यता देण्यात येत आहे.
अंदाजपत्रकातील दराबाबत सा.बां. विभागाचे परिपत्रक क्र उीएसआर 1090/सीआर-6453/नियो-3, दि.14/07/1993 व जीईएन-102001/सीआर-3/नियोजन-3, दि.22/02/2001 मधील तरतुदीचे अनुपालन झाले असल्याबद्दल खात्री करुन घेण्यात यावी.
डांबरीकरणाच्या तरतुदी सा.बां. विभाग परिपत्रक क्र.संकीर्ण-207/प्र.क्र.257/रस्ते-1 दि.21/01/2008, संकीर्ण-2009/ प्र.क्र.116/ रस्ते-1/ दि.04/12/2009 व क्र.संकीर्ण-2014/ प्र.क्र.06/ रस्ते-1 दि. 26/05/2014 व दि.07/08/2014 नुसार आहेत याची खात्री कार्यकारी अभियंता यानी करुन घ्यावी.
पावसाळयात पुरामुळे वाहतुक खेळंबण्याचे प्रमाण अनुज्ञेयापेक्षा कमी राहील याची खातरजमा करण्यात यावी. ही जबाबदारी संबंधीत कार्यकारी अभियंता यांची राहील, तसे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता यांनी द्यावे.
रस्ते व पुल बांधकाम ज्या ठिकाणी वन व पर्यवारण व अन्य विभागांची (MCZMA/ NCZMA/ SWLDB/ NWLDB/ASI Department ) इ. मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक त्या अटी पुर्ण करण्यात याव्यात. त्यासाठी संबधीत संस्थकडे अर्ज करण्याची जबाबदारी संबंधीत कार्यकारी अभियंता यांची राहील व अशी परवानगी प्राप्त झाल्यानंतरच काम सुरु करावे.
कामास वनजमीनीची आवश्यक असल्यास संबंधीत प्राधिकरणाची परवानगी घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता यांची असेल, वन जमिन ताब्यात मिळाल्याशिवाय डांबरीकरणाचे/ काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात येऊ नये.
कामासाठी मंजुर निधीच्या मर्यादेच्या अधीन राहुनच खर्च करण्यात यावा.
रिटेनिंग वॉलच्या संकल्पनास 10 मी उंचीपर्यंत अधीक्षक अभियंता व त्यावरील उंचीस मुख्य अभियंतायांची मंजुर घ्यावी.
रस्त्याच्या पृष्ठभागावरुन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य आकाराच्या व उतारात साईड गटर्स् करण्यात याव्यात. पाण्याचा निचरा न करता डांबरीकरणचे काम केलयास हे काम Defective Work म्हणुन गणले जाईल. अशा कामाचे देयकांची अदायगी करु नये. असे काम केले व रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला तर त्याकामारीता झालेल्या खर्चाची वसुली कंत्राटदाराकडुन पुर्णत: करावी तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवर सेवानियम खंड 8 अन्वये कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. जलनिस्सारण होत नसल्यास डांबरीकरण करुन नये, अशा ठिकाणी काँक्रीट पेव्हमेंटचे काम करावे.
रस्त्याच्या भौमितीक मानकांबाबत शासन परिपत्रक क्र. बीडीएम-1087/सीआर-5306/नियोजन-3/ दि.13/05/1988 व संबंधीत आ आर सी मधील तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे भौमित्तीक त्रृटी राहत असतील व भविष्यात रस्ता वाहतुकीस धोकादायक व Accident Prone होणार असेल तर असे पुल / रस्ते बांधण्यात येऊ नये.
कामाच्या नावामधील रस्त्याच्यालांबी मध्ये दोन वर्षे कालावधी करीता देखभाल व दुरुस्तीसाठी सा.बां. विभागाने लागु केलेले शासन निर्णय तसेच तांत्रिक परिपत्रके तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालातील नोंदी यांचे अनुपालन संबंधीत नियंत्रक अभियंता यांचे सुचनेप्रमाणे करण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची राहील. तसेच रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती Manual For Maintenance of Road (Morth) या पुस्तीकेमेध्ये नमुद केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल, या अशयाच्या कलमाचा समावेश निविदेमधील अटी व शर्तीमध्ये स्पष्टपणे असावा. पुलासाठी हा कालावधी 5 वर्षाचा राहील.
प्रस्तुत कामास तांत्रिक मंजुरी देण्यापुर्वी सदर रस्ता यासाठी लागणारी जमिन या विभागाच्या ताब्यात आहे, याची खातरजमा करुन घ्यावी.
तांत्रिक मान्यतेच्या अंदाजपत्रकात तरतुदी प्रत्येक दराचे वर्णन / दर/ पृथ:करणातील गृहीत धरलेली अंतरे व अनुषंगिक इतर बाबी विभागीय स्तरावर तपासण्यात आलेल्या आहेत या अटीवर तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
प्रशासकीय मान्यतेतील वाव अन्य कोणत्याही योजनेत / कार्यक्रमात समाविष्ठ नाही, याची खातरजमा कार्यकारी अभियंता यांनी केली आहे असे गृहीत धरुन या कामास तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
याकामासाठी अर्थसंकल्पात विशिष्ट तरतुद असल्याशिवाय हे काम सुर करण्यात येऊ नये.या कामास मंजुर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानानुसार मर्यादीत खर्च करावा.
तांत्रिक मान्यता प्राप्त लांबीत खड्डे पडल्यास काम खराब झल्यास किंवा पुल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी यांची राहील. त्या संबंधाची विशेष अट निविदेत मंजुर करावी. ही कारवाई Civil/ Criminal स्वरुपाची राहील याची नोंद संबंधीतांनी घेतली आहे. असे प्रमाणपत्र निविदेमध्ये जोडावे व त्यावर कंत्राटदाराची सही घ्यावी तसेच सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना याची जाणीव लिखित स्वरुपात कळवावी.
जा.क्र. प्रशा-1/ / /2023
कार्यालय :- कार्यकारी अभियंता,
सा.बां. (उत्तर) विभाग, ________ कार्यकारी अभियंता,
दिनांक : / / 2013 सा.बां. (उत्तर) विभाग, _______
प्रत :- सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना माहितीस्तव रवाना.
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know