सार्वजनिक बांधकाम विभागातील क्षेत्रिय कार्यालयातील विशेष अधीक्षक (गट-ब) व कनिष्ठ लिपिक ते अधीक्षक ( गट-क ) (अतांत्रिक) पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या
संदर्भ:-
१) सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१६७/सेवा-४, दि.११/०३/२०२२
२) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांचे 'पत्र क्र. का-४(२)/Fdrive/कर्तव्ये व जबाबदारी/२०२३/३२२४, दि.०६/०७/२०२३ व क्र. का-४(२)/Fdrive/कर्तव्ये व जबाबदारी/२०२४/८६६, दि.०८/०२/२०२४
सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय दिनांक ११/०३/२०२२ अन्वये सार्वजनिक बांधकाम विभागातील विशेष अधीक्षक (गट-ब) व कनिष्ठ लिपिक ते अधीक्षक (गट-क) (अतांत्रिक) पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करणेबाबत सखोल अभ्यास करुन उचित शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या अधक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती...
विवरणपत्र क्र.- १ : विशेष अधीक्षक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी (प्रादेशिक स्तर)
१ . विशेष अधीक्षक हे प्रादेशिक कार्यालयाच्या प्रशासकीय व अतांत्रिक कामाच्या अंमलबजावणीस व व्यवस्थापनाच्या बाबतीत मुख्य अभियंतास थेट जबाबदार राहतील.
२. प्रादेशिक कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व आस्थापना विषयक बाबी:-
(राजपत्रित अधिकाऱ्यांच्या आस्थापने विषयक पत्रव्यवहार, अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक तसेच सेवा अभिलेख...)
३. न्यायालयीन प्रकरणे, लोक आयुक्तांकडील प्रकरणे...
४. अतांत्रिक बाबीमध्ये वित्तीय लेखा, भांडारे व निविदा...
५. सरळसेवा भरती, बदली, ज्येष्ठता यादी याबाबतचा पत्रव्यवहार.
६. कार्यालयीन निरिक्षणे...
७. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९...
८. विभागीय चौकशी व शिस्तभंग विषयक प्रकरणे हाताळणे.
९. गोपनीय अहवाल...
१०. "जनमाहिती अधिकारी" (अतांत्रिक) म्हणून...
११. शासन सा.प्र. विभाग निर्णय दि.३१.१.२०१४ नुसार...
१२. पत्रव्यवहार शाखा विशेष अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली...
१३. अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार...
१४. याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे...
विवरणपत्र क्र.- २ :अधीक्षक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी (प्रादेशिक स्तर)
१) सदर पद हे या पदापेक्षा वरिष्ठ पदास (विशेष अधीक्षक) जबाबदार कर्मचारी म्हणून कार्यरत राहील.
२) प्रादेशिक कार्यालयातील गोपनीय शाखेंतर्गत होणारा पत्रव्यवहार.
३) प्रादेशिक कार्यालयातील तांत्रिक कर्मचाऱ्यांचा आस्थापना शाखेंतर्गत होणारा पत्रव्यवहार,
४) प्रादेशिक कार्यालयातील अतांत्रिक कर्मचाऱ्यांचा आस्थापना शाखेंतर्गत होणारा पत्रव्यवहार.
५) प्रादेशिक कार्यालयातील वेतन रोख शाखेंतर्गत होणारा पत्रव्यवहार.
६) प्रादेशिक कार्यालयातील अर्थ शाखेंतर्गत होणारा पत्रव्यवहार.
७) प्रादेशिक कार्यालयांतर्गत मंडळ/विभागाची वार्षिक तपासणी करणे व घेतलेल्या आक्षेपांची पूर्तता करून घेणे, अहवाल वाचन, त्याचप्रमाणे शासन/मुख्य अभियंता यांच्या वार्षिक तपासणीची तयारी करणे तसेच आक्षेपाबाबतचा पुर्तता / अनुपालन अहवाल सादर करणे.
८) महालेखापाल यांचे निरीक्षण अहवाल व परिच्छेद / आक्षेपाचे अनुपालन बाबतचा पत्रव्यवहार.
९) विभागीय चौकशी व शिस्तभंग विषयक प्रकरणे हाताळणे, लोक आयुक्त प्रकरणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील प्रकरणे, पी. जी. पोर्टल / आपले सरकार या संकेत स्थळावरुन प्राप्त झालेल्या तक्रारी विषयक पत्रव्यवहार.
१०) तक्रारी व खांतेविषयक निरनिराळ्या विषयी पत्रव्यवहार करणे, कामगार मागण्या, तंटे विवाद, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, कार्यालयीन टिप्पणी, पत्रे विशेष अधीक्षक / अधीक्षक यांना सादर करणे.
११) गोपनीय अहवाल तपासून पहाणे, त्यावर यथास्थिती प्रतिवेदन अधिकाऱ्यांची किंवा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची सही / प्रतिस्वाक्षरी घेणे, जे गोपनीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचे असतात अशा गोपनीय अहवालांच्या बाबतीत काही त्रुटी असल्यास तपासुन पाहणे व पुर्तता करून घेणे, गोपनीय अहवालातील चांगले अभिप्राय / प्रतिकूल शेरे संबंधित अधिकारी/कर्मचा-यांना कळविणे.
१२) मत्ता व दायित्वे विषयक पत्रव्यवहार.
१३) कार्यालयाची वार्षिक तपासणी व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे.
१४) अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार मुख्य अभियंता यांना राहतील.
१५) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे. तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने सदर कामाची कर्तव्ये व जबाबदारी संबंधितांची राहतील.
विवरणपत्र-३: प्रादेशिक कार्यालयातील प्रथम लिपीक (गोपनीय शाखा) पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) सदर पद हे या पदापेक्षा वरिष्ठ पदास जबाबदार कर्मचारी म्हणून कार्यरत राहील.
२) विभागीय चौकशी व शिस्तभंग विषयक प्रकरणे हाताळणे, लोकायुक्त प्रकरणे, लोकलेखा समिती साक्ष, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रकरणे.
३) आस्थापना / अतांत्रिक संदर्भात उपस्थित तारांकित, अतारांकित तसेच लक्षवेधी इत्यादी विषयक पत्रव्यवहार, स्थानिक अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष माहिती मिळविणे व त्या करिता पत्रव्यवहार करणे, तक्रारी संदर्भात पत्रव्यवहार करणे, कामगार मागण्या, तंटे विवाद, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
४) गोपनीय अहवाल तपासून पाहणे, त्यावर यथास्थिती प्रतिवेदन अधिकाऱ्यांची किंवा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची सही / प्रतिस्वाक्षरी घेणे. जे गोपनीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचे असतात, अशा अहवालांमध्ये काही त्रुटी असल्यास तपासून पाहणे व पुर्तता करून घेणे. तसेच गोपनीय अहवालातील चांगले अभिप्राय / प्रतिकूल शेरे संबंधित कर्मचाऱ्यांना कळविणे.
५) कार्यालयाची वार्षिक तपासणी व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करणे.
६) मत्ता व दायित्वे विषयक पत्रव्यवहार करणे.
७) अंतर्गत विषय वाटप / बदल करण्याचे अंतिम अधिकार मुख्य अभियंता यांना राहतील.
८) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे, तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने सदर कामाची कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.
विवरणपत्र-४ : प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) आस्थापना (तांत्रिक)
- आस्थापनेवरील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, पदोन्नती, वेतन निश्चिती, स्वेच्छानिवृत्ती, राजीनामा स्वीकृती बाबत प्रकरणे हाताळणे.
- कायम स्वरूपाची पदे निर्माण करण्यासाठी पत्रव्यवहार करणे, स्थायीकरण व प्रमाणपत्रे देणे, सेवापुस्तक तयार करणे व अद्यावत ठेवणे.
- ५० व ५५ वर्षी होणाऱ्या पुनर्विलोकनासाठी माहिती मागवणे व प्रकरणे समितीकडे ठेवणे.
- निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे वेळेवर तयार करणे.
- राजपत्रित अधिकाऱ्यांबाबत आस्थापना विषयक प्रकरणे हाताळणे.
- प्रशिक्षणासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
- संवर्गनिहाय जेष्ठता याद्या तयार करून आक्षेप नोंद व पत्रव्यवहार करणे.
- तांत्रिक अधिकाऱ्यांच्या रजेची प्रकरणे हाताळणे.
- मुख्य अभियंता कार्यभार मुक्ती (नमुना-९३) तक्ते तयार करणे.
२) आस्थापना (अतांत्रिक)
- कायम स्वरूपाची पदे निर्माण, स्थायीकरण, सेवापुस्तक व नियतकालीक बदल्यांबाबत प्रकरणे हाताळणे.
- ५० व ५५ वर्षीच्या पुनर्विलोकनाची माहिती मागवून समितीकडे सादर करणे.
- निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे व प्रस्ताव तयार करणे.
- नवीन पदे व अस्थायी पदांच्या प्रस्तावांची तयारी.
- तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियमपत्रक व पत्रव्यवहार.
- संवर्गनिहाय जेष्ठता याद्या व आक्षेपावर कार्यवाही.
- कर्मचाऱ्यांच्या / अधिकाऱ्यांच्या रजेची प्रकरणे हाताळणे.
३) वेतन विषयक कामकाज
- मासिक वेतन, भविष्य निर्वाह निधी, अग्रिम / अंतिम प्रदान व आश्वासित प्रगती योजना प्रकरणे.
- अग्रिम नोंदवही, अदा न झालेल्या वेतनाची नोंद, सेवापुस्तक व वेतन चिठ्ठी / वेतनपट तयार करणे.
- गट 'ड' कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे.
४) भांडार व अर्थविषयक पत्रव्यवहार
- भांडार विषयक सर्व पत्रव्यवहार व लेखनसामग्री व्यवस्था.
- संगणक, स्टेशनरी खरेदी व नोंदवही.
- भांडार पडताळणी पत्रव्यवहार.
- दूरध्वनी, नमुना-७८ पत्रव्यवहार.
- अर्थ विषयक कामकाज.
- वार्षिक अंदाजपत्रक व सुधारित अंदाजपत्रक पाठविणे.
- विनियोजन लेखे शासनास पाठविणे.
- त्रैमासिक, मासिक खर्च विवरणपत्रे महालेखापाल यांना व शासनास सादर करणे.
- सस्पेन्स लेखा, पुनर्विनियोजन प्रस्ताव पाठविणे.
- विविध लेखाशीर्षांखाली लेखे व विवरणपत्रे तयार करणे.
विवरणपत्र-५ : प्रादेशिक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१. आवक-जावक शाखा : आवक-जावक नोंदवही ठेवणे, अन्य कार्यालये व शाखा अधिकाऱ्यांची पत्रे स्वीकारणे, पत्रांची आवक नोंदवहीत नोंद करून ती पत्रे संबंधितांकडे पोहोचविणे. अन्य कार्यालयांना पाठविण्याच्या पत्रांची नोंद जावक नोंदवहीत करून, ती पत्रे संबंधित कार्यालयाच्या पत्यावर पाठविणे. त्या करिता आवश्यक असलेली पाकिटे / लखोटे संपूर्ण पत्त्यांसह तयार ठेवणे. स्थानिक पत्रांची स्वतंत्र लहान टपाल वहीत नोंद घेऊन ती संबंधित लिपिकांकडे पाठविणे. पाकिटांवर सेवा तिकीटे चिकटविणे किंवा यथास्थिती फ्रँकिंग यंत्राद्वारे टपाल तिकीट मुद्रांकित करणे व त्यानंतर ती पत्रे टपाल कार्यालयात टाकणे. तसेच यासंबंधीची नोंदवही व शासकीय डाक मुद्रांक लेखा नोंद व्यवस्थित ठेवणे.
२. विभागीय चौकशी शाखेस सहाय्य : विभागीय चौकशी शाखेच्या कामकाजात सहाय्य करणे.
३. भांडार शाखा : भांडार शाखेच्या कामकाजात सहाय्य करणे.
४. अंतर्गत विषय वाटप / बदल करण्याचे अंतिम अधिकार मुख्य अभियंता यांचेकडे राहतील.
५. याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे. तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यासंबंधित कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे.
विवरणपत्र-६ : अधीक्षक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी (मंडळ स्तर)
१) अधीक्षक हे मंडळ कार्यालयाच्या प्रशासकीय व अतांत्रिक कामाच्या अंमलबजावणीस व व्यवस्थापनाच्या बाबतीत अधीक्षक अभियंतास थेट जबाबदार राहतील.
२) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक १२.०४.१९७८ च्या आदेशानुसार प्रशासन शाखेचा शाखा प्रमुख या नात्याने त्या शाखेतंर्गत वाटप केलेली कर्तव्ये योग्य रितीने पार पाडतील.
३) मंडळ कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कार्यालयांच्या सर्व आस्थापना विषयक बाबी — सेवापुस्तक, सेवा अभिलेख, रजा, निधी, निवृत्तीवेतन, अग्रिम, स्थायिकरण, संवर्ग, प्रशिक्षण, आस्थायी-स्थायीकरण, बिंदूनामावली, मागासवर्गीय प्रकरणे, मोटार सायकल / संगणक / घरबांधणी अग्रिम, व विविध पत्रव्यवहार तपासणी व मार्गदर्शन करणे.
४) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ यांचे पालन करणे व करून घेणे.
५) हजेरी पटावर लक्ष ठेवणे व वेळेवर कार्यालयात अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर शासन निर्णय दि.३१.१२.२०२० नुसार कार्यवाही करणे.
६) कामवाटपानुसार टपाल वाटप, दफ्तर तपासणी, विविध नोंदवह्यांची तपासणी व कनिष्ठ लिपिकांना मार्गदर्शन करणे.
७) मासिक वेतनाबाबत पत्रव्यवहार करणे.
८) अधीक्षक अभियंता ठरविलेल्या सभेचे आयोजन व आवश्यक माहिती संकलन करणे.
९) मंडळातील विभाग / उपविभागांची वार्षिक तपासणी, आक्षेप निवारण व अहवाल सादर करणे.
१०) विभागीय चौकशी, शिस्तभंग प्रकरणे हाताळणे, विवरणपत्रे, प्रश्नोत्तरे तयार करणे.
११) सरळसेवा भरती (अनुकंपा), बदली, ज्येष्ठता यादी पत्रव्यवहार.
१२) महालेखापाल निरीक्षण अहवाल व आक्षेप पत्रव्यवहार.
१३) गोपनीय अहवाल, कार्यमूल्यमापन अहवाल, मत्ता व दायित्वे विवरणपत्रे पत्रव्यवहार.
१४) आस्थापन लिपिक वर्गाच्या सर्व पत्रव्यवहाराची देखरेख व नियंत्रण.
१५) तांत्रिक मसुदा वगळता मंजूर मसुद्याच्या टंकलिखित व स्वच्छ प्रतीवर स्वाक्षरी करणे.
१६) शासन सा.प्र.विभाग निर्णय दि.३१.१.२०१४ अन्वये नागरी सेवा मंडळ (२) सदस्य म्हणून कामकाज.
१७) अभिलेख आवश्यकतेनुसार जतन किंवा मंजुरीनंतर नष्ट करणे.
१८) अंतर्गत विषय वाटप / बदलाचा अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांचेकडे.
१९) वरिष्ठांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे पार पाडणे व त्यानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्या निभावणे.
विवरणपत्र-७ : मंडळ कार्यालयातील प्रथम लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
प्रथम लिपीक (गोपनीय शाखा)
१. सदर पद हे या पदापेक्षा वरिष्ठ पदास जबाबदार कर्मचारी म्हणून कार्यरत राहील.
२. विभागीय चौकशी व शिस्तभंग विषयक प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, लोकलेखा समिती साक्ष, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रकरणे हाताळणे.
३. आस्थापना / अतांत्रिक संदर्भातील तारांकित, अतारांकित, लक्षवेधी विषयक पत्रव्यवहार, स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती मिळविणे, तक्रारी, कामगार मागण्या, तंटे विवाद व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
४. गोपनीय अहवाल तपासून पाहणे, यथास्थिती प्रतिवेदन अधिकाऱ्यांची किंवा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची सही / प्रतिस्वाक्षरी घेणे, त्रुटी असल्यास तपासणी करून पुर्तता करणे, तसेच चांगले अभिप्राय / प्रतिकूल शेरे संबंधित कर्मचाऱ्यांना कळविणे.
५. कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे.
६. मत्ता व दायित्वे विषयक पत्रव्यवहार करणे.
७. अंतर्गत विषय वाटप / बदलाचा अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांचेकडे राहील.
८. याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे व त्यानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्या निभावणे.
विवरणपत्र-८ : मंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) तांत्रिक कार्यासन
१.१) तांत्रिक अधिकाऱ्यांचे ५० व ५५ वर्षी करावयाच्या पुनर्विलोकनाची माहिती मागवून, ती प्रकरणे विशेष पुनर्विलोकन समितीसमोर ठेवणे.
१.२) आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, पदोन्नती, वेतन निश्चिती, निवृत्ती, राजीनामा स्वीकृती इ. प्रकरणे हाताळणे. संवर्गनिहाय प्रतिवर्षी ज्येष्ठता याद्या तयार करून, त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे. ज्येष्ठतेबाबत आक्षेप आल्यास त्यावर कार्यवाही व पत्रव्यवहार करणे. कायम पदे निर्माण व स्थायीकरणाच्या प्रकरणांकरिता पत्रव्यवहार करणे व प्रमाणपत्रे देणे.
१.३) तांत्रिक अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके तयार करून अद्ययावत ठेवणे. दुय्यम सेवापुस्तके तयार करणे. नियतकालिक बदल्यांसाठी विकल्प मागवणे व आवश्यक माहिती तयार करणे.
१.४) निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे वेळेवर तयार करणे. आठ महिने आधी कागदपत्रे मागवून पूर्तता करणे. विलंब झाल्यास तात्पुरते वेतन आदेश तयार करणे.
१.५) राजपत्रित अधिकाऱ्यांच्या आस्थापना विषयक प्रकरणांची जबाबदारी.
१.६) तांत्रिक अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी प्रकरणे हाताळणे.
१.७) नियमित कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या रजा प्रकरणांची तपासणी व पत्रव्यवहार करणे.
१.८) अधीक्षक अभियंता यांचा कार्यभार (फॉर्म-९३) तयार करणे.
२) अतांत्रिक कार्यासन
२.१) ५० व ५५ वर्षी करावयाच्या पुनर्विलोकनाची माहिती मागवून, ती विशेष पुनर्विलोकन समितीकडे पाठवणे.
२.२) अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, पदोन्नती, वेतन निश्चिती, निवृत्ती, राजीनामा इ. प्रकरणे हाताळणे. ज्येष्ठता याद्या तयार करून, आक्षेप व पत्रव्यवहार करणे.
२.३) अतांत्रिक कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके तयार व अद्ययावत करणे. नियतकालिक बदल्यांबाबत विकल्प मागवणे.
२.४) निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे वेळेवर तयार करणे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून, विलंब झाल्यास तात्पुरते आदेश काढणे.
२.५) तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांचे पालन व पत्रव्यवहार करणे.
२.६) नवीन व अस्थायी पदांच्या प्रस्तावांची तयारी व शासनास सादर करणे.
२.७) नियमित कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या रजा प्रकरणांची छाननी व पत्रव्यवहार करणे.
३) निविदा शाखा
३.१) निविदा विषयक सर्व पत्रव्यवहार.
३.२) कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व सहकारी संस्थांची नोंदणी व वर्गीकरण.
३.३) निविदा संबंधित न्यायालयीन व लवाद प्रकरणे हाताळणे.
३.४) कंत्राटदाराकडून वसुली संदर्भात पत्रव्यवहार करणे.
३.५) सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी काम वाटपाच्या बैठका आयोजित करणे, इतिवृत्त तयार करणे व उपस्थित शेऱ्यांची पूर्तता करून अधीक्षक अभियंत्यांना अहवाल सादर करणे.
४) अर्थ शाखा
४.१) अर्थ विषयक बाबी हाताळणे.
४.२) वार्षिक, चारमाही, आठमाही व सुधारित अंदाजपत्रके तयार करणे व विभागांना पाठविणे.
४.३) लेखाशीर्षानिहाय वार्षिक खर्च विनियोजन पत्रक पाठविणे.
४.४) त्रैमासिक, मासिक खर्च विवरणपत्रे महालेखापालांना व शासनास सादर करणे.
४.५) सस्पेन्स लेखा तिमाही विवरणपत्रावर आदेश घेणे व निधी पुनर्विनियोजन बाबत पत्रव्यवहार करणे.
४.६) मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक लेखाशीर्ष विवरणपत्रे तयार करणे.
४.७) दरमहा लेखा टिप्पणीचे अनुपालन करणे.
४.८) नमुना-८८ मध्ये प्रलंबित रकमा व धनादेशाबाबत त्रैमासिक अहवाल शासनास सादर करणे. पतपत्र मर्यादा व मंजुरीसाठी कार्यवाही करणे.
४.९) महालेखपाल यांचेकडून आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही व पूर्तता करणे.
४.१०) निधी नोंदवही ठेवणे, प्रलंबित देयक व रोख ठेव नोंदवहीची पूर्तता करणे.
४.११) निरीक्षण अहवालांचे अनुपालन करणे, खर्च हिशोब व दायित्व नोंदवहीची देखभाल करणे.
४.१२) प्रलंबित अंतिम देयकांची यादी तयार करणे.
विवरणपत्र-९ : मंडळ कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) आवक-जावक शाखा :
आवक-जावक नोंदवही ठेवणे, अन्य कार्यालये तथा शाखा अधिकाऱ्यांची पत्रे स्वीकारणे, पत्रांची आवक नोंदवहीत नोंद करून ती पत्रे संबंधितांकडे देणे. अन्य कार्यालयांच्या पत्रांची नोंद जावक नोंदवहीत घेतल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या पत्यावर पाठविणे. त्या करिता आवश्यक असणारी पाकिटे/लखोटे त्यावर संपूर्ण पत्ते लिहून तयार ठेवणे. स्थानिक पत्रे वेगळ्या लहान टपाल वहीत नोंद घेऊन संबंधित लिपिकांकडे पाठविणे. पाकिटावर सेवा तिकीटे चिकटवून किंवा यथास्थिती फ्रँकिंग यंत्रणेद्वारे टपाल तिकीट मुद्रांकित करणे, ती पोस्टात टाकणे व त्यासंबंधीची नोंदवही ठेवणे. शासकीय डाक मुद्रांकांच्या लेखा नोंदवहीत नोंदी ठेवणे.
२) रोजंदारी / रूपांतरीत आस्थापना :
रोजंदारी व रूपांतरीत आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पदरूपांतरणाचा प्रस्ताव तयार करणे. या कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची प्रकरणे हाताळणे. नियमित व रूपांतरीत आस्थापनेवरील पदे पुढे चालू ठेवण्याबाबत प्रस्ताव तयार करणे. अपघातासंबंधीची प्रकरणे हाताळणे. विविध कामगार संघटनांच्या मागण्यांवरील प्रस्ताव व तदनुषंगाने होणाऱ्या सभा, बैठका, चर्चा यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करणे व पत्रव्यवहार करणे. कामगार संबंधित कार्यालयीन प्रकरणे हाताळणे.
३) वेतन कार्यासन :
३.१) मंडळ कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची वेतन देयके तयार करणे. (अदा न केलेल्या वेतनाची नोंदवही ठेवणे, वेतन चिठ्ठी व वेतनपट तयार करणे, वेतन प्राप्तीकर अभिलिखित करणे.)
३.२) गट-अ ते गट-ड अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी प्रकरणे हाताळणे. (विवरणपत्रे, अग्रीम, नोंदवही, वार्षिक लेखा चिठ्ठ्या इत्यादी)
३.३) गट-अ ते गट-ड अधिकारी/कर्मचाऱ्यांचे घरबांधणी, मोटरसायकल, संगणक अग्रीम प्रकरणे व त्यावरील पत्रव्यवहार.
३.४) वैद्यकीय देयकांसंदर्भातील सर्व स्तरावरील पत्रव्यवहार.
३.५) कोषागारात रोख भरणा केलेल्या रकमेचा ताळमेळ व प्रपत्र तयार करणे.
३.६) सेवार्थ प्रणाली / BDS प्रणाली / बिल पोर्टल प्रणालीवर देयके तयार करणे. सेवार्थ प्रणालीमधून निवृत्तीवेतन तयार करणे व कोषागार कार्यालयाकडे ऑनलाइन अ, ब, क फॉर्म पाठविणे.
४) भांडार व संकीर्ण शाखा :
४.१) भांडार विषयक सर्व पत्रव्यवहार (निलंबन लेखे, राखीव भांडार, विवरणपत्रे, लेखन सामग्री, नमुने)
४.२) संगणक, स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी व नोंदवहीत नोंद करणे.
४.३) भांडार पडताळणी विषयक पत्रव्यवहार.
४.४) मोजमाप पुस्तकातील नोंदीची पडताळणी करणे.
४.५) भाडे वसुली संबंधी पत्रव्यवहार.
४.६) शासकीय विश्रामगृह संबंधी पत्रव्यवहार.
४.७) निवासी / अनिबासी गाळे, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, भूसंपादन संबंधी प्रकरणे व न्यायालयीन तक्रारी हाताळणे.
४.८) संकीर्ण प्रकरणांचा पत्रव्यवहार.
४.९) मंडळातील सर्व न्यायालयीन प्रकरणांचे संकलन व नोंदवही अद्ययावत ठेवणे.
४.१०) अ, ब, क, ड नोंदवही अद्ययावत ठेवणे.
४.११) अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचा अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांच्याकडे राहील. (सर्व कनिष्ठ लिपिकांना लागू)
४.१२) याशिवाय वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे. तसेच सोपवलेल्या कामाच्या अनुषंगाने संबंधित कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे. (सर्व कनिष्ठ लिपिकांना लागू)
विवरणपत्र-१० : परिमंडळ कार्यालयातील अधीक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) गट-क कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीचे आयोजन करणे.
२) परिमंडळ स्तरावरील बदल्यांबाबत पत्रव्यवहार करणे.
३) शासनाने जबाबदारी नियुक्त केल्यास सरळसेवा भरतीसंदर्भातील पत्रव्यवहार करणे.
४) शासन स्तरावरील आस्थापना विषयक सर्व प्रकारचा पत्रव्यवहार करणे.
५) गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करणे, जतन करणे व आवश्यकतेनुसार शासनास सादर करणे.
६) मानीव दिनांकासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
७) परिमंडळ स्तरावरील लोकायुक्त व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
८) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाच्या अनुकंपा पदभरतीबाबत कार्यवाही करणे.
९) सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभांची कार्यवाही करणे.
१०) अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांना राहतील.
११) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे, तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने त्या कामांची कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.
विवरणपत्र-११ : परिमंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) गट-क कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीचे आयोजन करणे.
२) परिमंडळ स्तरावरील बदल्यांबाबत पत्रव्यवहार करणे.
३) शासनाने जबाबदारी नियुक्त केल्यास सरळसेवा भरतीसंदर्भातील पत्रव्यवहार करणे.
४) शासन स्तरावरील आस्थापना विषयक सर्व प्रकारचा पत्रव्यवहार करणे.
५) गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करणे, जतन करणे व आवश्यकतेनुसार शासनास सादर करणे.
६) मानीव दिनांकासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
७) परिमंडळ स्तरावरील लोकायुक्त व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
८) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाच्या अनुकंपा पदभरतीबाबत कार्यवाही करणे.
९) सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभांची कार्यवाही करणे.
१०) अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांना राहतील.
११) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे, तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने त्या कामांची कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.
विवरणपत्र-१२ : परिमंडळ कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी (नव्याने समावेश)
१) गट-क कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीचे आयोजन करणे.
२) परिमंडळ स्तरावरील बदल्यांबाबत पत्रव्यवहार करणे.
३) शासनाने जबाबदारी नियुक्त केल्यास सरळसेवा भरतीसंदर्भातील पत्रव्यवहार करणे.
४) शासन स्तरावरील आस्थापना विषयक सर्व प्रकारचा पत्रव्यवहार करणे.
५) गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करणे, जतन करणे व आवश्यकतेनुसार शासनास सादर करणे.
६) मानीव दिनांकासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
७) परिमंडळ स्तरावरील लोकायुक्त व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
८) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाच्या अनुकंपा पदभरतीबाबत कार्यवाही करणे.
९) सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभांची कार्यवाही करणे.
१०) अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार अधीक्षक अभियंता यांना राहतील.
११) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे, तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने त्या कामांची कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.
विवरणपत्र-१३ : विभागीय कार्यालयातील प्रथम लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) प्रथम लिपीक विभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय व अतांत्रिक कामकाजाच्या अंमलबजावणीस व व्यवस्थापनास कार्यकारी अभियंत्यास थेट जबाबदार राहतील.
२) विभागीय कार्यालयातील माहिती अधिकारासंदर्भात कार्यकारी अभियंता यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणे.
३) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक १२.०४.१९७८ च्या आदेशानुसार प्रशासन शाखेचा प्रमुख म्हणून त्या शाखेतील सर्व कामकाजास जबाबदार राहणे.
४) इतर कार्यालयाकडून आलेली पत्रे (गोपनीय पत्रव्यवहार वगळून) उघडणे, त्यावर योग्य ती चिन्हांकने करणे, कार्यकारी अभियंत्यांच्या सूचनेनुसार स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती मिळवणे व पत्रव्यवहार करणे.
५) प्रशासन शाखेतील टिपण व पत्रव्यवहार कार्यकारी अभियंत्यांना सादर करणे, पत्रांवर मंजुरी घेणे, टंकलेखक / डाटा एंट्री ऑपरेटर व आवक-जावक लिपीकांना योग्य ती पत्रे देणे. तसेच प्रशासन शाखेतील कागदपत्रे तपासणे, टंकलेखन व तातडीच्या पत्रांचा आढावा घेणे. विविध प्रकारची वेतन व भत्त्यांची देयके (मासिक वेतन, प्रवास भत्ता, स्वग्राम भत्ता, अग्रिम, वैद्यकीय देयके, निवृत्तीवेतन इत्यादी) कोषागारात सादर करण्यापूर्वी तपासणी करणे.
६) तक्रारींसंदर्भात कार्यकारी अभियंत्यांच्या सूचनेनुसार पत्रव्यवहार करणे, कामगार मागण्या, तंटे, न्यायालयीन प्रकरणे बाबत संबंधित कार्यासनाशी समन्वय ठेवणे व पाठपुरावा करणे.
७) गोपनीय अहवाल तपासणे, त्रुटी असल्यास पूर्तता करून घेणे, चांगले अभिप्राय किंवा प्रतिकूल टिप्पण्या संबंधित कर्मचाऱ्यांना कळवणे.
८) विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मत्ता-दायित्व विवरणपत्रे वरिष्ठ कार्यालयास सादर करणे व त्याची नोंद ठेवणे.
९) प्रादेशिक / मंडळ कार्यालयाकडून होणाऱ्या वार्षिक तपासणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करणे, उपविभागाची तपासणी करणे व आक्षेपांची पूर्तता करून घेणे.
१०) हजेरीपट व आवक-जावक रजिस्टरवर बारकाईने लक्ष ठेवणे व शासन निर्णय, सा. प्र. विभाग, दिनांक ३१.१२.२०२० नुसार कार्यवाही करणे.
११) अभिलेख आवश्यकतेनुसार जतन करणे किंवा मंजुरी घेऊन नष्ट करण्याबाबत पाठपुरावा करणे.
१२) विभागीय कार्यालयातील विविध समित्यांचा (उदा. महिला तक्रार निवारण समिती) त्रैमासिक आढावा घेणे व कार्यकारी अभियंत्यांच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करणे.
१३) कार्यकारी अभियंत्यांनी विभागीय कामकाजाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने नेमून दिलेली इतर कामे पार पाडणे.
१४) अंतर्गत विषय वाटप / बदल करण्याचे अंतिम अधिकार कार्यकारी अभियंत्यांना राहतील.
१५) याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे व त्यांच्या अनुषंगाने असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
विवरणपत्र-१४
विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
तांत्रिक कार्यासन आस्थापना-१ (वरिष्ठ लिपिक-१)
- कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके तयार करून त्यातील नोंदी अद्यावत ठेवणे, दुय्यम सेवापुस्तके तयार करून ती संबंधितांना देणे.
- नियतकालीक बदल्यांबाबत कर्मचाऱ्यांचे विकल्प मागवून घेणे व आवश्यक माहिती तयार करून सक्षम स्तरावर सादर करणे.
- ५० व ५५ वर्षी करावयाच्या पुनर्विलोकनाची माहिती मागवून ती प्रकरणे विशेष पुनर्विलोकन समितीसमोर ठेवणे.
- निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे तयार करणे. निवृत्तीवेतन कागदपत्रांची पूर्तता करणे व विलंब झाल्यास तात्पुरते आदेश काढणे.
- राजपत्रित अधिकाऱ्यांच्या आस्थापना व प्रशिक्षणासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
- अनुकंपा विषयक बाबी हाताळणे व ज्येष्ठता यादी दरवर्षी अद्ययावत करणे.
- नियमित आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके ठेवणे.
- रजेची प्रकरणे हाताळणे.
- नेमणूक, बदल्या, पदोन्नती, वेतन निश्चिती, निवृत्ती, राजीनामा स्वीकृती यांसंबंधी प्रकरणे हाताळणे व ज्येष्ठता यादी तयार करणे.
- विभागीय चौकशी संदर्भातील पत्रव्यवहार.
- शासन/मुख्य अभियंता स्तरावरील चौकशीसाठी माहिती व कागदपत्रे यंत्रणेस देणे.
- वर्ग-१ व वर्ग-२ कार्यभार फॉर्म-९३ तयार करणे.
- पी.जी.पोर्टल व आपले सरकार संकेतस्थळावरील तक्रारींचा पत्रव्यवहार करणे.
अतांत्रिक कार्यासन आस्थापना-२ (वरिष्ठ लिपिक-२)
- कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके तयार करून अद्यावत करणे.
- बदल्यांबाबत विकल्प मागवून माहिती सादर करणे.
- ५० व ५५ वर्षी पुनर्विलोकनाची माहिती मागवून ती समितीसमोर ठेवणे.
- निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे पूर्ण करणे.
- नवीन व अस्थायी पदांच्या प्रस्तावांची कार्यवाही.
- अनुकंपा व ज्येष्ठता यादी अद्ययावत करणे.
- तृतीय व चतुर्थश्रेणी सेवा प्रवेश नियम पत्रव्यवहार.
- रजेची प्रकरणे हाताळणे.
- चौकशी तक्रारींचा पत्रव्यवहार.
- आस्थापनेवरील नेमणूक, बदली, पदोन्नती, स्थायीकरण यांची कार्यवाही.
- पी.जी.पोर्टल व आपले सरकार तक्रारी हाताळणे.
लेखा शाखा अंतर्गत:
निविदा / नोंदणी शाखा (वरिष्ठ लिपिक-३)
- निविदा विषयक सर्व पत्रव्यवहार, निविदा मसुदा तयार करणे, सुचना प्रसिध्दी व निविदा उघडण्यापासून कार्यारंभ आदेशापर्यंत प्रक्रिया.
- मंजूर निविदांची नोंद व नोंदवही अद्ययावत ठेवणे.
- निविदा संदर्भातील न्यायालयीन व लवाद प्रकरणे हाताळणे.
- सुरक्षा ठेव प्रमाणपत्र व बँक गॅरंटीची नोंद ठेवणे व नुतनीकरण.
- कार्यारंभ आदेश संबंधितांना पोच करणे.
- निविदा निश्चितीनंतर अनामत रक्कम व स्टॅम्प ड्युटी भरणेबाबत कार्यवाही.
विवरणपत्र-१५
विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
१) आवक-जावक शाखा (कनिष्ठ लिपीक क्र.-१)
- आवक-जावक नोंदवही ठेवणे.
- अन्य कार्यालये व शाखांकडून आलेली पत्रे स्वीकारणे व त्यांची नोंद करणे.
- पत्रांची आवक नोंद करून ती संबंधितांकडे पोहोचविणे.
- जावक पत्रांची नोंद घेऊन ती विहित पत्यावर पाठविणे.
- शासकीय डाक, मुद्रांक व गोपनीय नोंदणी रजिस्टरची देखरेख.
- मा. लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
२) आस्थापना शाखा (कनिष्ठ लिपीक क्र.-२)
- नियमित व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण हाताळणे.
- रूपांतरीत आस्थापना प्रस्ताव तयार करणे.
- अपघातासंबंधी प्रकरणे हाताळणे.
- कामगार संघटनांशी संबंधित पत्रव्यवहार व बैठकांचे कामकाज.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
३) वेतन कार्यासन (कनिष्ठ लिपीक क्र.-३)
- मासिक वेतन पत्रव्यवहार व सेवार्थ प्रणाली.
- भविष्य निर्वाह निधी, गट विमा, रजा रोखीकरण प्रकरणे.
- सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांची कार्यवाही.
- वार्षिक वेतन प्रमाणपत्र व फॉर्म-१६ तयार करणे.
- अग्रीम व न गेलेल्या वेतन नोंदवही.
- वेतनपट, देयक अंदाजपत्रक व अन्य देयके.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
४) लेखापरीक्षक (कनिष्ठ लिपीक क्र.-४)
- उपविभागीय कार्यालयाच्या देयकांचे लेखापरीक्षण.
- मुदतवाढ व नुकसानभरपाईसंबंधी पत्रव्यवहार.
- निविदा शर्त-३ व १५ अंतर्गत प्रकरणे.
- कंत्राटदार वसुली पत्रव्यवहार.
- अंतिम देयकांची यादी व आर्थिक लिपिकास सादरीकरण.
- कंत्राटदार पत्रव्यवहार उत्तरे व विभागीय लेखापालाकडे सादरीकरण.
- न्यायालयीन प्रकरणे व देयकांचे मोजमाप तपासणी.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
५) लेखापरीक्षक (कनिष्ठ लिपीक क्र.-५)
- उपविभागीय कार्यालयाच्या देयकांचे लेखापरीक्षण.
- मुदतवाढ, नुकसानभरपाई, निविदा शर्त-३ व १५ अंतर्गत प्रकरणे.
- कंत्राटदार वसुली, अंतिम देयकांची यादी.
- उत्तरे तयार करून विभागीय लेखापालाकडे सादरीकरण.
- न्यायालयीन प्रकरणे व देयकांचे मोजमाप तपासणी.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
६) लेखापरीक्षक (कनिष्ठ लिपीक क्र.-६)
- उपविभागीय कार्यालयाच्या देयकांचे लेखापरीक्षण.
- मुदतवाढ, नुकसानभरपाई, निविदा शर्त-३ व १५ अंतर्गत प्रकरणे.
- कंत्राटदार वसुली, अंतिम देयकांची यादी.
- उत्तरे तयार करून विभागीय लेखापालाकडे सादरीकरण.
- न्यायालयीन प्रकरणे व देयकांचे मोजमाप तपासणी.
- टिप-१, २ व ३ मधील कर्तव्यांची पूर्तता.
विवरणपत्र-१६
उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
अ. क्र. व कर्तव्ये व जबाबदाऱ्या:
- उपविभागातील लिपीक म्हणून काम पाहणे, अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा प्रकरणे तपासणे, वैद्यकिय देयके तपासणे, अतांत्रिक रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील कर्मचारी वर्ग ३ व ४ यांचे पत्रव्यवहार, कॅश बुक लिहिणे व सांभाळणे, वेतन देयक तपासणे, माहिती अधिकारातील अर्जाबाबत कार्यवाही करणे, कामाशी संबंधित निविदाविषयक तसेच सर्व प्रकारची कार्यवाही करणे, हजेरीपत्रकाच्या नोंदीवर नियंत्रण ठेवणे, गोपनीय पत्रव्यवहार व गोपनीय अहवाल विषयक बाबी हाताळणे, आणि सहायक अभियंता/उपविभागीय अभियंता/उपविभागीय अधिकारी तथा समकक्ष अधिकारी यांनी नेमून दिलेली सर्व कामे करणे.
- अंतर्गत विषय वाटप/बदल करण्याचे अंतिम अधिकार सहायक अभियंता/उपविभागीय अभियंता/ उपविभागीय अधिकारी तथा समकक्ष अधिकारी यांना राहतील.
- याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे. तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने त्या कामाची कर्तव्ये व जबाबदारी संबंधितांची राहील.
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२८/सेवा-४, दि. ०६/०५/२०२५ सोबतचे विवरणपत्र.
विवरणपत्र-१७
उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी
अ.क्र. व कर्तव्ये व जबाबदाऱ्या:
-
कनिष्ठ लिपीक (आवक लिपीक / जावक लिपीक):
- शासनाकडून, इतर विभागांकडून व जनतेकडून प्राप्त पत्र/डाक स्विकारणे व संबंधितास पोच देणे.
- प्राप्त झालेले गोपनीय व अर्धशासकीय पत्रे वेगवेगळ्या डाकपॅडमध्ये बांधून उपअभियंता यांचेकडे मार्किंगसाठी सादर करणे.
- डाक उपअभियंता यांच्या आदेशानुसार आवक क्रमांक देऊन संबंधित लिपीकाकडे हस्तांतरित करणे.
- कार्यालयातील पत्रे शासनास, विविध कार्यालयांना व जनतेस पाठविणे.
- पत्रांच्या पाकिटावर आवश्यक तिकीट चिकटवणे व स्पीडपोस्ट, पंजीबंध डाकाद्वारे पाठविणे.
- तिकीटांचा हिशोब राखणे.
- भांडार अभिलेख सांभाळणे.
- उपविभागीय अभियंता यांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.
-
कनिष्ठ लिपीक (आस्थापना):
- रूपांतरीत आस्थापना कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर प्रदान करण्यासाठी कार्यवाही करणे.
- सेवापुस्तक सांभाळणे व वेळोवेळी आवश्यक नोंदी करणे.
- घरबांधणी आगाऊ व इतर आगाऊ मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करणे.
- पगार देयक तयार करणे व मासिक खर्च विवरण तयार करणे.
- भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा प्रकरणे मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे व नियतकालिक विवरण तयार करणे.
- उपविभागीय अभियंता यांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.
- अंतर्गत विषय वाटप / बदल करण्याचे अंतिम अधिकार सहायक अभियंता / उपविभागीय अभियंता / उपविभागीय अधिकारी तथा समकक्ष अधिकारी यांना राहतील.
- याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नेमून दिलेली सर्व कामे हाताळणे. तसेच वरिष्ठांनी सोपविलेल्या कामाच्या अनुषंगाने सदर कामाची कर्तव्ये व जबाबदारी संबंधितांची राहील.
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know