अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण
शासन निर्णय
क्रमांक अकंपा- १२२५/प्र.क्र. १२१/म.लो.आ. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. (दिनांक : १७ जुलै, २०२५)
संदर्भ :-
१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दिनांक २६.१०.१९९४
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र. ३४-अ/आठ, दिनांक २३.०८.१९९६
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र. ३४-अ/आठ, दिनांक ११.०९.१९९६
४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९६/प्र.क्र.६७/९६/आठ, दिनांक २०.१२.१९९६
५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,दि.१२.०३.१९९७
६. शासन परिपत्रक क्र. अकंपा-१०९७/प्र.क्र.१९/९७/आठ, दि. ०७.०६.१९९७
७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९७/प्र.क्र.३२/ आठ, दिनांक ०८.०९.१९९७
८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९७/प्र.क्र.५०/९७/आठ, दिनांक ०४.१०.१९९७
९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,दि२१.११.१९९७
१०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९८/प्र.क्र.५/९८/आठ, दिनांक १०.०३.१९९८
११. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/ प्र.क्र.२०/२०००/आठ, दि. २८.०३.२००१
१२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/ प्र.क्र.५/२००१/आठ, दिनांक ०२.०५.२००१
१३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/प्र.क्र.५९/२०००/आठ, दिनांक
२४.०९.२००१ व दि.२१.११.२००२
१४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००१/प्र.क्र.५/२००२/आठ, दिनांक ३०.०७.२००२ व दि.२२.०१.२००३
१५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.२५/२००३/आठ, दि. १३.०६.२००३
१६. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.५१/२००३/आठ, दि. २९.१०,२००३
१७. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.५९/२००३/आठ, दि. ३०.०१.२००४
१८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दि.२२.०८.२००५
१९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००६/प्र.क्र.१७४/०६/आठ, दि. १७.०७.२००७
२०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००७/प्र.क्र.१८१/०७/आठ, दि. ०१.०१.२००८
२१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/अनी.१७/०८/प्र.क्र. ३५/०८/आठ, दि. ३१.०३.२००८
२२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००७/१२९५/प्र.क्र.१८१/०७/आठ, दिनांक २३.०४.२००८
२३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.८७/०८/आठ, दिनांक ०६.११.२००८
२४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ, दिनांक २०.०१.२००९ व दि.१३.११.२०१९
२५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/११४२/प्र.क्र.१६६/०८/आठ, दि.१०.०७.२००९
२६. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/८२२६/प्र.क्र.२०१/०९/आठ, दिनांक ०५.०२.२०१०
२७. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/६७/प्र.क्र.४१/१०/आठ, दिनांक १५.०५.२०१०
२८. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र. २४४/आठ, दि. १३.१०.२०१०
२९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र.३०८/आठ, दिनांक ०६.१२.२०१०
३०. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/५८२/प्र.क्र.७६/२००९/आठ, दिनांक ०५.०३.२०११
३१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१२/प्र.क्र.२०४/आठ, दिनांक १७.०९.२०१२
३२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ, दिनांक २६.०२.२०१३
३३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.३४/आठ, दिनांक ०१.०३.२०१४ व दि.०२.०५.२०१४
३४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.१६४/आठ, दिनांक २०.०५.२०१५
३५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१५/प्र.क्र.४७/आठ, दिनांक २८.१०.२०१५
३६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.१५५/आठ, दिनांक १७.११.२०१६
३७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.४६/आठ, दिनांक ०३.०५.२०१७
३८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.१०२/आठ, दिनांक २१.०९.२०१७(एकत्रिकरण) व दि.०४.०८.२०१८ चे शुध्दीपत्रक
३९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२१८/प्र.क्र०१/आठ, दिनांक १५.०२.२०१८
४०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२१९/प्र.क्र५६/आठ, दिनांक १०,०६.२०१९ व दि.११.०९.२०१९ व दि.२२.१२.२०२१
४१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२०/प्र.क्र१६७/आठ, दिनांक ०६.०१.२०२१
४२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र.९८/आठ, दिनांक २३.०६.२०२१
४३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र१८६/आठ, दिनांक २६.०८.२०२१
४४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र११२/आठ, दिनांक २७.०९.२०२१
४५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२२/प्र.क्र.९६/आठ, दिनांक १९.०९.२०२२
प्रस्तावना:-
अनुकंपा नियुक्ती योजना १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. सन १९९४ मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते.
सदर अनुकंपा धोरणात खालील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
१) न्यायालयीन अडचणी - प्रामुख्याने खालील न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत.
- कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे.
- प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे.
- प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे.
या विविध न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या Larger Bench ने रिट याचिका क्र.३७०१/२०२२ (श्रीम. कल्पना विलास तारम व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) व इतर संलग्न रिट याचिकांमध्ये दि.२८.०५.२०२४ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करणे आवश्यक आहे.
२) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीतील विलंब - अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे. तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज निदर्शनास आली.
३ ) योजनेचे सुलभीकरण आवश्यक सन १९९४ पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत
एकूण ४५ आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात. तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे.
उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेवून, प्रचलित अनुकंपा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
उपरोक्त प्रस्तावना विचारात घेवून, संदर्भाधीन सर्व शासन आदेश अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात येत आहे.
(1) अनुकंपा नियुक्ती धोरणातील मुलभूत तरतूदी -
१ योजनेचे उद्दिष्ट
शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी, कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देणे.
२ योजना कोणास लागू आहे.
गट-अ ते गट-ड मधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस ही योजना लागू आहे. परंतु असे की, दिवंगत कर्मचाऱ्याचा पती/पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.
परंतु आणखी असे की, दिनांक ३१ डिसेंबर, २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.
३ अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
४ कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
गट-क व गट ड मधील ज्या ज्या संवर्गात सरळसेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहेत्या सर्व संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
५ अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य -
कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. त्यामुळे कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची त्याने खालीलप्रमाणे ना-हरकत प्रमाणपत्र "परिशिष्ट-ड" मधील नमुन्यामध्ये देणे आवश्यक आहे.
""प्राधान्यक्रम | दिवंगत व्यक्तीशी नाते | ना-हरकत प्रमाणपत्र देणे |
1 | कायदेशीर पत्नी/पती | ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. |
2 | मुलगा/मुलगी (अविवाहित/विवाहित), मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी (अविवाहित/विवाहित), घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण | रकाना क्र.१ मधील सदस्य व या रकान्यातील इतर सदस्य |
3 | दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून | रकाना क्र.१ व २ मधील सदस्य |
4 | केवळ दिवंगत अविवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवंलबून असणारा भाऊ किंवा बहीण | केवळ या रकान्यातील इतर सदस्य |
६ अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता
अ | वयोमर्यादा | किमान वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत |
ब | सेवाप्रवेश नियमात विहित केलेली अर्हता | संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहीत केलेली शैक्षणिक अर्हता, तांत्रिक अर्हता तसेच अन्य अर्हता उमेदवाराने धारण करणे आवश्यक राहील. परंतु दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत नसेल तर केवळ गट-ड मध्ये नेमणुकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्याचे अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला असतील. |
क | टंकलेखन अर्हता | गट-क मधील ज्या संवर्गाच्या सेवाप्रेवश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे, अशा गट-क संवर्गातील पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याने, नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.. तसेच म.ना.से. (संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम-१९९९ व त्यामध्ये दि.२८.०५.२०१८ च्या अधिसूचनेद्वारे केलेल्या सुधारणांनुसार, अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याने, नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तथापि, २ वर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र (ज्या पदांसाठी आवश्यक आहे) तसेच संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्यास खालील परिणाम होतील. टंकलेखन व संगणक अर्हता ही दोन्ही प्रमाणपत्रे सादर करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही. सदर दोन प्रमाणपत्रांपैकी जे प्रमाणपत्र नंतर सादर करण्यात येईल त्या दिनांकास संबंधित कर्मचाऱ्यास वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल. विलंबाच्या कालावधीतील वेतनवाढी काल्पनिकरित्या अनुज्ञेय राहतील. यास्तव सदर कालावधीतील वेतन व भत्त्यांची कोणतीही थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असणार नाही. |
ड | संगणक अर्हता प्रमाणपत्र (म.ना.से. (संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम-१९९९ त्यामध्ये दि.२८.०५.२०१८ च्या अधिसूचनेद्वारे केलेल्या सुधारणांनुसार } |
७ अनुकंपा नियुक्तीचे प्रमाण
अ | गट-क संवर्गासाठी | गट-क मधील त्या त्या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २०% पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावीत. तसेच अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध होणाऱ्या २०% पदांची गणना करण्याबाबत सोबतच्या ""परिशिष्ट-अ नुसार उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाने सरळसेवा भरतीस विशिष्ट कालावधीसाठी निबंध लागू केले तरी सदर २०% पदांवर अनुकंपा नियुक्तीस ते निर्बंध लागू राहणार नाहीत. परंतु असे की, शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्याचा नक्षलवादी /आतंकवादी/ दरोडेखोर / समाज विघातक यांच्या हल्ल्यात/कारवाईत मृत्यू झाल्यास, अशा अधिकारी/कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस अनुकंपा नियुक्तीसाठी २०% मर्यादेची अट शिथिल करुन त्यांना प्राथम्याने अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. |
ब | गट-ड संवर्गासाठी | गट-ड मधील अनेक संवर्गाची पदे ही संबंधित विभागांच्या सुधारीत आकृतिबंधामध्ये बाहय यंत्रणेमधून भरण्याबाबत निर्णय झाला असल्याने, अनुकंपा नियुक्तीसाठी पदे उपलब्ध होत नाहीत. यास्तव, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमतः २ वर्षासाठी, गट-ड च्या सरळसेवा कोटयातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या २०% पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करुन, गट-ड मधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात येत आहेत. शासन निर्णयाच्या दिनांकापासून २ वर्षानंतर गट-ड च्या प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेवून मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल. |
(II) कुटुंबास योजनेची माहिती देणे -
कुटुंबास योजनेची माहिती देणे शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास अनुकंपा योजनेची माहिती देणे, इच्छुकता पत्र भरुन घेणे व परिपूर्ण अर्जाचा नमुना देणे ही कार्यालय प्रमुखाची जबाबदारी राहील.
१) शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाकडून कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभदेण्याच्या अनुषंगाने कागदपत्रे भरुन घेत असताना, त्यांना त्याचवेळी प्रत्यक्ष अनुकंपा योजनेची माहिती द्यावी.
२) योजनेची माहिती देतानाच, सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ब" येथील विहित नमुन्यात इच्छुकता पत्र हे त्यांच्याकडून भरुन घेणे. तसेच इच्छुक नसल्यास तसे पत्र भरुन घेणे. इच्छुकता पत्र भरुन घेतल्याची पोच पावती देण्यात यावी.
३) कुटुंबास सोबत जोडलेला "परिशिष्ट-क" येथील परिपूर्ण अर्जाचा नमुना देणे व त्याच्याकडून त्याबाबतची पोच पावती घेणे.
(III) मृत शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने करावयाची कार्यवाही-
(१) परिपूर्ण अर्ज सादर करणे -
सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-क" येथील विहित नमुन्यात अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर करणे. तसेच अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अ) जोडावयाची कागदपत्रे अर्जात नमूद केल्यानुसार उमेदवाराचे वय, शैक्षणिक अर्हता, इतर अर्हता इ. बाबतची कागदपत्रे.
आ) नाहरकत प्रमाणपत्र कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची त्याने सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ड" नुसार ना-हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
(२) परिपूर्ण अर्ज सादर करण्याची विहित मुदत -
कुटुंबाने इच्छुकता पत्र सादर केल्याच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या मुदतीत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज कार्यालय प्रमुखास सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा कुटुंबियाचे नाव इच्छुकता यादीतून वगळण्यात येईल.
(IV) कार्यालय प्रमुखाने करावयाची कार्यवाही -
१) इच्छुकता यादी ठेवणे -
कार्यालय प्रमुखाने इच्छुकता पत्र भरुन घेतल्यानंतर, अशा इच्छुक उमेदवारांची एक स्वतंत्र यादी कार्यालयाच्या स्तरावर ठेवावी.
२) प्राप्त परिपूर्ण अर्जाची छाननी करुन गट निश्चित करणे -
परिपूर्ण अर्ज विहित नमुन्यात आहे का व त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडण्यात आली आहेत का, याची छाननी करावी. तसेच गट निश्चित करण्यासाठी उमेदवाराने अर्जात नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही सेवाप्रवेश नियमातील ज्या गटाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार असेल त्यानुसार त्याचा अनुकंपा नियुक्तीचा गट निश्चित करावा.
३) विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज प्राप्त न झाल्यास -
खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास, विलंब क्षमापित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील. यास्तव कार्यालय प्रमुखाने विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत सादर केलेला अर्ज विलंब क्षमापित करावा किंवा कसे यासाठी जिल्हाधिकारी यांना सादर करावा.
कुटुंबातील सदस्य | विहित मुदत उपरोक्त (III) २ नुसार | विलंब क्षमापित करण्याची मुदत | ५ वर्षाच्या मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास |
सज्ञान | इच्छुकता पत्र सादर केल्यापासून ३ वर्षे | २ वर्ष (जिल्हाधिकारी यांना अधिकार) | त्या कुटुंबाचे नाव इच्छुकता यादीतून वगळावे. |
अज्ञान (१८ वर्षापेक्षा कमी वय) | अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यापासून ३ वर्षे | २ वर्ष (जिल्हाधिकारी यांना अधिकार) |
जिल्हाधिकारी यांनी पुढील बाबी विचारात घेवून विलंब क्षमापित करावा किंवा कसे याबाबत निर्णय घ्यावा. इच्छुकता पत्राद्वारे कुटुंबास अनुकंपा नियुक्तीची माहिती देवून, परिपूर्ण अर्ज करण्यास ३ वर्षे इतका पुरेसा कालावधी देवून देखील विहित मुदतीत अर्ज सादर करणे का शक्य झाले नाही याची कारणमीमांसा तपासून, विलंब हा अपरिहार्य कारणास्तव झाला असल्याचे आढळून आले तरच सदर विलंब क्षमापित करावा. जिल्हाधिकारी यांनी विलंब क्षमापित केल्यास कार्यालय प्रमुखाने उपरोक्त मुद्दा क्र. IV (२) नुसार अर्जाची छाननी करुन उमेदवाराचा अनुकंपा नियुक्तीचा गट निश्चित करावा तसेच उमेदवाराचे नाव अर्ज सादर केल्याच्या दिनांकास प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट करावे.
जिल्हाधिकारी यांनी विलंब क्षमापित न केल्यास कार्यालय प्रमुखाने कुटुंबाचे नाव इच्छुकता यादीतून वगळावे.
(V) गट निश्चितीनंतर करावयाची कार्यवाही -
परंतु असे की, नियुक्ती प्राधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा अनेक जिल्हयांमध्ये असेल तर दिवंगत कर्मचारी ज्या जिल्हयात कार्यरत असताना दिवंगत झाला त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवावा.] C --> E[उमेदवार हा गट-ड च्या नियुक्तीस पात्र असल्याचे कार्यालय प्रमुखाने निश्चित केल्यावर, त्याचे नाव गट-ड च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाकडे पाठवावा. प्रस्तावामध्ये उमेदवाराच्या परिपूर्ण अर्जाचा दिनांक कटाक्षाने नमूद करावा. कारण त्या दिनांकानुसार प्रतिक्षासूचीतील स्थान निश्चित होते.]
(VI) अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिक्षासूची ठेवण्याबाबतची कार्यपध्दती
(VII) उमेदवाराच्या विनंतीनुसार प्रतिक्षासूचीचा गट बदलणे अथवा प्रतिक्षासूचीतील नाव बदलणे
अ उमेदवाराच्या विनंतीनुसार त्याचा प्रतिक्षासूचीचा गट बदलणे.
उमेदवारास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच प्रतिक्षासूचीचा गट बदलण्याचा विनंती अर्ज करण्याची मुभा राहील. प्रतिक्षासूचीचा गट बदलण्याची विनंती फक्त एकदाच करता येईल. तसेच विनंती अर्जानुसार उमेदवाराचा गट बदलण्याची कार्यवाही केल्यानंतर पुन्हा मूळ गटात नाव समाविष्ट करुन अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय होणार नाही.
१) उमेदवाराने गट-ड च्या प्रतिक्षासूचीमधून गट-क च्या प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करावयाची विनंती केल्यास -
- उमेदवाराने गट-ड च्या प्रतिक्षासूचीत असताना, दरम्यानच्या कालावधीत त्याची शैक्षणिक अर्हता उन्नत करुन गट-क साठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता धारण केल्यास, त्याने नियुक्ती प्राधिकारी कार्यालयास त्याचे नाव गट-ड च्या यादीतून वगळून गट-क मध्ये समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा.
- नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्यानुसार शैक्षणिक अर्हता उन्नत झाल्याची खातरजमा करुन त्याचे नाव विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकास गट-क च्या यादीत समाविष्ट करावयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच बृहन्मुंबईसाठी सामान्य प्रशासन विभाग/प्रशा-२ कार्यासनास पाठवावा.
- जिल्हाधिकारी कार्यालयाने / सामान्य प्रशासन विभाग / प्रशा-२ कार्यासनाने त्यानुसार त्याचे नाव गट-क च्या प्रतिक्षासूचीमध्ये विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकास समाविष्ट करुन नियुक्ती प्राधिकाऱ्यास त्याबाबत अवगत करावे.
- त्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्याने गट-ड च्या प्रतिक्षासूचीमधून त्याचे नाव वगळावे.
२) उमेदवाराने गट-क च्या प्रतिक्षासूचीमधून गट-ड च्या प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करावयाची विनंती केल्यास
उमेदवाराने गट-क च्या प्रतिक्षासूचीतून नाव वगळून गट-ड च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच बृहन्मुंबईसाठी सामान्य प्रशासन विभाग / प्रशा-२ कार्यासनास विनंती अर्ज करावा.
- जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच बृहन्मुंबईसाठी सामान्य प्रशासन विभाग / प्रशा-२ कार्यासनाने त्याचे नाव विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकास गट-ड च्या यादीत समाविष्ट करावयाचा प्रस्ताव संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यास पाठवावा.
- नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्यानुसार त्याचे नाव गट-ड च्या प्रतिक्षासूचीमध्ये विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकास समाविष्ट करुन जिल्हाधिकारी कार्यालयास त्याबाबत अवगत करावे.
- त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच बृहन्मुंबईसाठी सामान्य प्रशासन विभाग/प्रशा-२ कार्यासनाने गट-क च्या प्रतिक्षासूचीमधून त्याचे नाव वगळावे.
ब प्रतिक्षासूचीतील उमेदवार बदलणे :-
खालील परिस्थितीत प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे अनुज्ञेय राहील. उमेदवार बदलण्यासाठी अर्ज करावयाचा नमुना हा सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ई" नुसार राहील.
1 | प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्यास | १) प्रतिक्षासूचीतील उमेदवाराऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा.
२) विनंती अर्ज हा प्रतिक्षासूचीतील उमेदवारास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील. ३) विनंती अर्जासोबत कुटुंबातील अन्य सदस्यांचे नाहरकत प्रमाणपत्र हे या शासन निर्णयातील मुद्दा क्र. 1 (५) मधील प्राधान्यक्रमानुसार सादर करणे आवश्यक राहील. ४) विनंती अर्ज हा प्रतिक्षासूचीतील उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवाराचे वय ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन मूळ उमेदवाराचे नाव ज्या दिनांकास प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट केले होते त्या दिनांकास नवीन उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात येईल. तथापि, प्रतिक्षासूचीत मूळ उमेदवाराचे नाव समाविष्ट केल्याचा जो दिनांक आहे त्या दिनांकास नवीन उमेदवार सज्ञान नसेल अथवा सर्व अटींची पूर्तता करत नसेल, तर तो सज्ञान होईल त्या दिनांकास अथवा अटींची पूर्तता करेल त्या दिनांकास नाव समाविष्ट करण्यात येईल. ५) ३ वर्षाच्या विहित मुदतीनंतर पुढील २ वर्षात विनंती अर्ज केल्यास ज्या दिनांकास विनंती अर्ज करण्यात येईल त्या दिनांकास प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येईल. ६) तद्नंतर विनंती अर्ज केल्यास म्हणजेच प्रतिक्षासूचीतील उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवाराचे वय ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून ५ वर्षानंतर विनंती अर्ज केल्यास सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. |
2 | प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास. | |
3 | १) प्रतिक्षासूचीतील उमेदवाराचे नाव वगळून त्याऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा प्रतिक्षासूचीतील उमेदवाराने त्याच्या ऐवजी कुटुंबातील अन्य सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा अर्ज केल्यास व नाव बदलण्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास. | १) प्रतिक्षासूचीतील उमेदवाराचे नाव वगळून त्याऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा.
२) विनंती अर्ज हा प्रतिक्षासूचीतील उमेदवारास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील. ३) अशा प्रकारे विनंती अर्ज करण्याची मुभा केवळ एकदाच असेल. ४) विनंती अर्जासोबत कुटुंबातील अन्य सदस्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र हे या शासन निर्णयातील मुद्दा क्र.। (५) मधील प्राधान्यक्रमानुसार सादर करणे आवश्यक राहील. ५) ज्या दिनांकास नाव बदलण्यासाठी अर्ज सादर केला जाईल त्या दिनांकास नवीन उमेदवाराचे नाव प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट करावे. |
(VIII) प्रतिक्षासूचीतील उमेदवारास अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती -
अ) गट-क च्या पदावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिक्षासूचीतून अनुकंपा नियुक्तीची कार्यपध्दती
१) अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती घेणे - संबंधित जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या २०% प्रमाणे (शासन निर्णयातील मुद्दा क्र. (1) (७) (अ) नुसार) अनुकंपा नियुक्तीसाठी किती पदे उपलब्ध होतात याची माहिती सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-फ" येथील नमुन्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून संकलित करावी.
२) उमेदवारांचा पसंतीक्रम घेण्यासाठी मेळावा आयोजित करणे - जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण रिक्त पदसंख्येएवढ्या प्रतिक्षासूचीतील सर्व उमेदवारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसाचा मेळावा आयोजित करावा. मेळावा आयोजित करण्यापूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी एकूण उपलब्ध रिक्त पदे व त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता याची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द करावी. मेळाव्यात आमंत्रित सर्व उमेदवारांना जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध असलेली एकूण रिक्त पदसंख्या अवगत करून उमेदवारांकडून कोणत्या नियुक्ती प्राधिकारी कार्यालयात नियुक्ती हवी आहे याबाबतचा लेखी पसंतीक्रम भरून घ्यावा.
३) अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करणे - उमेदवारांच्या प्रतिक्षासूचीतील ज्येष्ठतेनुसार उमेदवारांचा पसंतीक्रम विचारात घेऊन त्यांना संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयात अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने शिफारस करावी.
परंतु, प्रतिक्षासूचीतील उमेदवार हा अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी तांत्रिक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील शैक्षणिक/तांत्रिक अर्हता धारण करीत नसेल तर त्याच्याऐवजी प्रतिक्षासूचीवरील पुढील उमेदवाराचा विचार करावा.
तथापि, प्रतिक्षासूचीतील कोणताच उमेदवार तांत्रिक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील विशिष्ट शैक्षणिक/तांत्रिक अर्हता धारण करत नसेल तर अशा प्रकरणी तांत्रिक संवर्गातील संबंधित रिक्त पद हे अनुकंपा नियुक्तीऐवजी सरळसेवेने भरण्यात यावे.
४) नियुक्ती आदेश - नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीचे आदेश निर्गमित करावे. त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावी.
५) प्रतिक्षासूचीतील नाव वगळणे - जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवाराचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क च्या प्रतिक्षासूचीतून वगळावे.
६) शासनास अहवाल सादर करणे - जिल्हाधिकारी कार्यालयाने गट-क च्या प्रतिक्षासूचीवर किती उमेदवार होते, त्यापैकी किती उमेदवारांना नियुक्ती दिली व त्यानंतर प्रतिक्षासूचीत किती उमेदवार प्रलंबित आहेत याबाबतचा सहामाही अहवाल सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ह" नुसार सादर करावा.
ब. गट-ड च्या पदावर नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाच्या प्रतिक्षासूचीतून अनुकंपा नियुक्तीची कार्यपध्दती -
१) मृत पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव पाठविणे - नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने गट-ड मधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे, त्या पदसंख्येच्या मर्यादेत प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेवून तेवढी पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सादर करावा.
२) पदे पुनर्जीवित करण्याचे आदेश - प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिकारात, गट-ड ची जेवढी पदे मृत झाली आहेत त्या पदसंख्येच्या मर्यादेत नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या प्रस्तावानुसार आवश्यक पदे ही नियमित पदे म्हणून पुनर्जीवित केल्याचे आदेश काढावेत. सदर आदेशामध्ये गट-ड च्या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती केलेला कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे हे पद रिक्त झाल्यावर ते नियमित पद व्यपगत होईल ही बाब नमूद करावी.
३) अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे नियुक्तीच्या अनुषंगाने मेळावा आयोजित करणे - जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हातील सर्व नियुक्ती प्राधिकारी यांचा एक दिवसासाठीचा मेळावा आयोजित करावा. सदर मेळाव्यात कोणकोणत्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे अनुकंपा नियुक्तीची यादी प्रलंबित आहे तथापि, पुनर्जीवित करण्यासाठी पद उपलब्ध नाही. तसेच, कोणकोणत्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे अनुकंपा नियुक्तीची यादी प्रलंबित नाही तथापि, पुनर्जीवित करण्यासाठी पदे उपलब्ध आहेत याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ग" नुसार संकलित करुन त्याचा आढावा घेणे, आढाव्याअंती एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची दुसऱ्या नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाकडे पदे पुनर्जीवित करुन नियुक्ती देणे शक्य असल्याचे आढळून आल्यास त्यानुसार एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयात अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत शिफारस करावी.
४) मेळाव्याअंती प्राप्त शिफारशीनुसार पदे पुनर्जीवित करणे - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिफारशीनुसार, नियक्ती प्राधिकारी कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या संख्येएवढी मृत घोषित केलेली पदे उपरोक्त अनुक्रमांक १ व २ येथील कार्यपद्धतीचा अवलंब करून पुनर्जीवित करणे,
५) नियुक्ती आदेश - नियुक्ती प्राधिकारी यांनी पुनर्जीवित केलेल्या गट-ड च्या पदांवर अनुकंपा नियुक्तीचे आदेश निर्गमित करावे. त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावी.
६) प्रतीक्षासूचीतील नाव वगळणे - नियुक्ती प्राधिकाऱ्याने नियुक्तीचे आदेश दिलेल्या उमेदवाराचे नाव गट-ड च्या प्रतीक्षासूचीतून वगळावे.
७) जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करणे - जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांनी गट-ड च्या प्रतिक्षासूचीवर किती उमेदवार होते, त्यापैकी किती उमेदवारांना नियुक्ती दिली व त्यानंतर प्रतिक्षासूचीत किती उमेदवार प्रलंबित आहेत याबाबतचा सहामाही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने संकलित करुन तो सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-ह" नुसार सादर करावा.
(IX) इतर अनुषंगिक बाबी -
१) अनुकंपा नियुक्ती हा वारसा हक्क नाही - अनुकंपा नियुक्ती हा वारसा हक्क नसल्याने कुटुंबातील उमेदवार सेवाप्रवेश नियमातील अटी व शर्तीनुसार संबंधित पदासाठी पात्र असेल तरच अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय ठरते.
२) महाराष्ट्र सदन हे एकमेव शासकीय कार्यालय दिल्ली येथे स्थित असून त्या कार्यालयासाठी जिल्हास्तरावर गट-क ची प्रतिक्षासूची ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यास्तव महाराष्ट्र सदन कार्यालयातील शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी, महाराष्ट्र सदन यांच्या स्तरावर गट-क व गट-ड ची प्रतिक्षासूची ठेवण्यात येईल. सदर प्रतिक्षासूचीतून महाराष्ट्र सदन कार्यालयात अनुकंपा नियुक्ती या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार देण्यात येईल.
३) सैनिक कल्याण विभाग, पुणे व सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या दोन आस्थापनांवर त्यांच्या सेवाप्रवेश नियमानुसार तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केवळ माजी सैनिकांमधूनच भरती अनुज्ञेय आहे. त्यामुळे या दोन आस्थापनांवर अनुकंपा नियुक्ती देता येऊ शकत नाही. यास्तव, या दोन आस्थापनांवरील कार्यरत माजी सैनिक सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्ती केवळ माजी सैनिकांमधूनच भरती अनुज्ञेय आहे. त्यामुळे या दोन आस्थापनांवर अनुकंपा नियुक्ती देता येऊ शकत नाही. यास्तव, या दोन आस्थापनांवरील कार्यरत माजी सैनिक सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी संबंधित आस्थापनांनी जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. गट-क च्या नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट-क च्या प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. तसेच गट-ड च्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आढावा घेताना, ज्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पद उपलब्ध होवू शकते त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सदर उमेदवाराची गट-ड पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करावी.
४) सदर शासन निर्णय हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून, निमशासकीय कार्यालये/स्थानिक स्वराज्य संस्था/ शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरुन स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील.
५) हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होईल. यास्तव हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकास प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट असणाऱ्या उमेदवारांच्या प्रकरणी, प्रतिक्षासूचीचा गट बदलणे अथवा उमेदवार बदलणे यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. तसेच मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या Larger Bench ने रिट याचिका क्र.३७०१/२०२२ (श्रीम. कल्पना तारम व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) व इतर संलग्न रिट याचिकांमध्ये दिनांक २८.०५.२०२४ रोजी न्यायनिर्णय दिला असल्याने या न्यायनिर्णयाच्या दिनांकानंतर ज्या उमेदवारांचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे वगळण्यात आले आहे अशा उमेदवारांच्या प्रकरणी देखील अन्य उमेदवाराचे नाव प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी.
सोबतच्या परिशिष्टांचा गोषवारा
अ.क्र. | परिशिष्ट क्रमांक | परिशिष्टाचा विषय |
1 | अ | अनुकंपा नियुक्तीसाठी २०% ची गणना करण्याबाबतचे उदाहरण |
2 | ब | इच्छुकता पत्राचा नमुना |
3 | क | परिपूर्ण अर्जाचा नमुना |
4 | ड | ना-हरकत प्रमाणपत्राचा नमुना |
5 | इ | प्रतिक्षासूची ठेवण्याचा नमुना |
6 | ई | प्रतिक्षासूचीतील उमेदवार बदलण्यासाठीच्या विनंती अर्जाचा नमुना |
7 | फ | गट-क पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहितीचा नमुना |
8 | ग | गट-ड पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहितीचा नमुना |
9 | ह | शासनास अनुकंपा नियुक्तीचा अहवाल सादर करण्याचा नमुना |
परिशिष्ट-"अ"
गट-क च्या पदावर सरळसेवा कोटयात प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या २० टक्के पदांची गणना करण्याबाबत खालील उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. 1 (७) (अ) नुसार}
१) सरळसेवेची मंजूर पदे १०० असतील व त्यापैकी निवडसूची वर्ष सन २०२२-२०२३ मध्ये १० पदे रिक्त असतील तर सदर १० पदांच्या २०% पदे म्हणजेच २ पदे अनुकंपा नियुक्तीने भरावीत.
२) उर्वरित ८ पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही करावी.
३) त्यानंतर निवडसूची वर्ष २०२३-२४ मध्ये मागील निवडसूची वर्षातील रिक्त १० पदांपैकी २ पदांवर अनुकंपा नियुक्ती दिली आणि ८ पदांवर सरळसेवेने उमेदवार उपलब्ध झाला नाही म्हणून ती पदे रिक्त असली तरी ही ८ रिक्त पदे सन २०२३-२४ या निवडसूची वर्षासाठी पुन्हा विचारात घेता येऊ शकत नाहीत. कारण सदर ८ पदे पूर्वीच्या निवडसूची वर्षामध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी २० टक्के पदांची गणना करताना विचारात घेवून ती सरळसेवेने भरण्यासाठी निश्चित केली आहेत. त्यामुळे ही सरळसेवेसाठी निश्चित केलेली ८ पदे जरी सद्यःस्थितीत भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली नसली तरी ही ८ पदे पुन्हा पुढील निवडसूची वर्षीच्या नव्याने रिक्त झालेल्या पदांसोबत विचारात घेवून त्याच्या २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीसाठी निश्चित केल्यास त्यामुळे सरळसेवा कोटयासाठी उपलब्ध पदांची संख्या कमी होवून गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होईल.
४) यास्तव सन २०२३-२४ या निवडसूची वर्षात सरळसेवा कोटयात जी पदे नव्याने रिक्त होतील केवळ त्याच रिक्त पदांच्या २०% पदांवर अनुकंपा नियुक्ती द्यावी.
५) तसेच अनुकंपा नियुक्तीसाठी संबंधित निवडसूची वर्षातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या २०% पदांची गणना करताना ती पदसंख्या १ पेक्षा कमी येत असल्यास (म्हणजेच ०.२, ०.६, ०.८ वगैरे) किमान १ पद अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावे.
परिशिष्ट 'ब'
इच्छुकता पत्राचा नमुना
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. 11 (२) नुसार}
प्रति,
कार्यालय प्रमुख
___________ कार्यालय (कार्यालयाचा पत्ता)
विषयः- अनुकंपा नियुक्तीसाठी इच्छुक असल्याबाबत.
महोदय,
श्री/श्रीम. पद यांचे शासकीय सेवेत असताना दि.रोजी निधन झाले असून आमच्या कुटुंबास शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आमचे कुटुंब हे अनुकंपा नियुक्तीसाठी इच्छुक आहे / इच्छुक नाही.
तसेच अनुकंपा नियुक्तीसाठी इच्छुकता दिली म्हणजे आमचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार केला जाऊ शकत नसून ज्यावेळी विहित कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करु त्यावेळी आमचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार केला जाईल याची मला जाणीव आहे.
त्याचप्रमाणे सदर इच्छुकता पत्रापासून तीन वर्षाच्या विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर न केल्यास आमचे नाव इच्छुकता यादीतून वगळण्यात येईल ही बाब देखिल अवगत आहे.
आपला/आपली,
सही/-
(संपूर्ण नाव व दिनांक)
तसेच मृत शासकीय कर्मचाऱ्याशी असलेले नाते
परिशिष्ट 'क'
परिपूर्ण अर्जाचा नमुना.
(शासन निर्णयातील मुद्दा क्र. 11 (३) नुसार)
१. शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्याची माहिती
(क) नांव व पदनाम:-
(ख) जात प्रवर्ग:- (साक्षांकीत छायाप्रत)
(ग) जन्म दिनांक:-
(घ) मृत्यूचा दिनांक:-
(ङ) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा दिनांक:-
(च) मृत कर्मचाऱ्याच्या एकूण अपत्यांची संख्या :-
२. अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची माहिती
(अ) नांव:-
(आ) जात प्रवर्गः (साक्षांकित छायाप्रत)
(इ) त्याचे/तिचे मृत अधिकारी/कर्मचा-याशी असलेले नाते:-
(ई) जन्म दिनांक:-
(उ) शैक्षणिक अर्हता:-
(ऊ) टंकलेखन प्रमाणपत्र धारण करीत असल्यास त्याबाबतची माहिती:-
(ऋ) संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करीत असल्यास त्याबाबतची माहिती:-
(ल) एकूण अपत्यांची संख्या :-
३. मृत अधिकारी/कर्मचा-याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील
अ. क्र. | नांव | जन्म दिनांक | शासकीय कर्मचा-याशी नाते व वय | नोकरीचा प्रकार खाजगी/शासकीय/निमशासकीय | मासिक उत्पन्न |
1 | |||||
2 | |||||
3 |
४. कुटुंबातील इतर सदस्यांनी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी नामांकन पत्र / नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे काय ?
प्रतिज्ञापत्र
सदर प्रतिज्ञापत्राद्वारे मी स्वेच्छेने नमूद करतो/करते की, मला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर दिवंगत यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे योग्य प्रकारे पालनपोषण करण्याची जबाबदारी माझी राहील. तसेच भविष्यात माझ्याकडून कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ करण्यात कसुर झाला असे सिध्द झाले, तर माझी नोकरी समाप्त होईल याची मला पूर्ण जाणीव आहे.
मी याद्वारे असेही घोषित करतो/करते की, अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून भविष्यात त्यापैकी कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची आढळली तर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या क्र.सीडीआर-१०९३/१०७७/प्र.क्र.२३/९३/अकरा, दि.१२.१०.१९९३ च्या शासन निर्णयानुसार, माझी नियुक्ती समाप्त करण्यात येईल, याची मला पूर्ण जाणीव आहे.
दिनांक-
उमेदवाराची सही.
परिशिष्ट 'ड'
ना-हरकत प्रमाणपत्राचा नमूना
(शासन निर्णयातील मुद्दा क्र. 1 (५) नुसार)
कै.श्री/श्रीमती ________________________ हे/ही राज्य शासकीय सेवेत _____________येथे _______________ या पदावर सेवेत असताना त्यांचा दि. _______________रोजी मृत्यू झाला आहे. आंम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य असून आमची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | कुटुंबातील सदस्याचे नाव | दिवंगत शासकीय अधिकारी/कर्मचारी याच्याशी असलेले नाते | आमच्या कुटुंबातील श्री/श्रीमती |
1 | |||
2 | |||
3 | |||
4 |
आमच्या कुटुंबातील श्री/श्रीमती ___________ (अर्जदार) यांना अनुकंपा नियुक्ती देण्यास आंम्ही खाली स्वाक्षरी करणाऱ्या शासन निर्णयातील । (५) नुसार नमूद केलेल्या कुटुंबातील सदस्यांची कोणतीही हरकत नाही असे या नाहरकत प्रमाणपत्राद्वारे स्वेच्छेने लिहून देत आहोत.
सदर ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद केलेली सर्व माहिती खरी व बरोबर आहे. ती खोटी असल्याचे आढळून आल्यास आमचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरेल याची आम्हाला जाणीव आहे.
दिनांक:-
ठिकाण:- (कुटुंबातील ना-हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व सदस्यांची नावे व स्वाक्षरी)
परिशिष्ट-"इ"
अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी/सा.प्र.वि. प्रशा-२ आणि नियुक्ती प्राधिकारी यांनी ठेवावयाच्या
प्रतिक्षासूचीचा नमुना
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. VI नुसार}
नियुक्ती प्राधिकाऱ्याचे नाव
अ. क्र. | प्रतिक्षासूचीमधील तपशिल | उमेदवाराचे नाव | दिवंगत कर्मचाऱ्याचे नाव व पद | उमेदवाराचा तपशिल | नियुक्तीबाबतची सद्य:स्थिती | |||||
प्रतिक्षा सूचीतील क्रमांक | प्रतिक्षा सूची मध्ये नाव समाविष्ट केल्याचा दिनांक | जन्म दिनांक | शैक्षणिक अर्हता | इतर अर्हता | जात प्रवर्ग | नियुक्ती आदेशाचा दिनांक, नियुक्तीचे कार्यालय व पद | नियुक्ती प्रलंबित | |||
1 |
परिशिष्ट 'ई
प्रतिक्षासूचीतील उमेदवार बदलण्यासाठीच्या विनंती अर्जाचा नमुना.
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. VII (ब) नुसार}
१. शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्याची माहिती
(अ) नांव:-
(ब) पदनाम:-
(क) जात प्रवर्ग:-
(ड) मृत्यूचा दिनांक:-
२. (अ) प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव:-
(ब) कोणत्या गटाच्या प्रतिक्षासूचीत नाव आहे तो गट (गट-क/गट-ड):-
(क) प्रतिक्षासूची क्रमांक:-
(ड) मूळ उमेदवाराने त्याचा अनुकंपा नियुक्तीचा दावा सोडल्याचे कारण:-
(इ) कुटुंबातील सदस्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे का :-
३. (अ) नवीन उमेदवाराचे नांव:-
(ब) उमेदवाराचा जात प्रवर्ग:-
(क) अर्ज ज्या गटासाठी आहे तो गट (गट-क/ड):-
(ड) त्याचे/तिचे मृत शासकीय अधिकारी/कर्मचा-याशी नातेः-
(इ) जन्म दिनांक:-
(फ) उमेदवाराची शैक्षणिक अर्हताः-
(ह) टंकलेखन प्रमाणपत्र धारण करीत असल्यास त्याबाबतची माहिती:-
(ज) संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करीत असल्यास त्याबाबतची माहिती:-
(ल) एकूण अपत्यांची संख्या :-
प्रतिज्ञापत्र
सदर प्रतिज्ञापत्राद्वारे मी स्वेच्छेने नमूद करतो/करते की, मला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर दिवंगत -यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे योग्य प्रकारे पालनपोषण करण्याची जबाबदारी माझी राहील. तसेच भविष्यात माझ्याकडून कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ करण्यात कसुर झाला असे सिध्द झाले, तर माझी नोकरी समाप्त होईल याची मला पूर्ण जाणीव आहे.
मी याद्वारे असेही घोषित करतो/करते की, अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून भविष्यात त्यापैकी कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची आढळली तर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या क्र.सीडीआर-१०९३/१०७७/प्र.क्र.२३/९३/अकरा, दि.१२.१०.१९९३ च्या शासन निर्णयानुसार, माझी नियुक्ती समाप्त करण्यात येईल, याची मला पूर्ण जाणीव आहे.
दिनांक-
उमेदवाराची सही.
परिशिष्ट 'फ'
गट-क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. VIII (अ) (१) नुसार}
नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाचे नांव - | अ.क्र. | संवर्गाचे नाव | वेतनश्रेणी | अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदसंख्या | शैक्षणिक अर्हता | इतर अर्हता |
1 |
परिशिष्ट 'ग'
गट-ड वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदे व प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या याबाबतची माहिती
{शासन निर्णयातील मुद्दा क्र. VIII (ब) (३) नुसार}
नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाचे नांव -
अ.क्र. | नाव संवर्गाचे | संवर्गाची शैक्षणिक व इतर अर्हता | मृत घोषित केलेल्या पदांची पदसंख्या | अनुकंपा प्रतिक्षासूचीवरील उमेदवारांची संख्या | रकाना क्र.४ व ५ येथील आकडेवारीनुसार प्रतिक्षासूचीतील उमेदवारांच्या संख्येपेक्षा मृत पदसंख्या कितीने जास्त/कमी आहे |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
परिशिष्ट-ह
अनुकंपा नियुक्तीबाबत शासनास सादर करावयाच्या अहवालाचा नमुना
(टिप:- सदर अहवाल सहामाही सादर करावयाचा असल्याने, प्रतिवर्षी निवडसूची वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात तसेच ६ महिन्यांनंतर म्हणजेच मार्च च्या पहिल्या आठवडयात असे वर्षातून दोन वेळा अनुकंपा नियुक्तीबाबतचे अहवाल सादर करावेत.)
सप्टेंबर महिन्यात सादर करावयाचा अहवाल
अ. क्र. | जिल्हा | ०१ मार्च रोजी प्रतीक्षासूची वरील प्रलंबित उमेदवारांची संख्या | मागील ६ महिन्यात नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची संख्या | ०१ सप्टेंबर रोजी प्रतिक्षासूचीवरील प्रलंबित उमेदवारांची संख्या | ||||||
गट-क | गट-ड | एकूण | गट-क | गट-ड | एकूण | गट-क | गट-ड | एकूण | ||
1 |
मार्च महिन्यात सादर करावयाचा अहवाल
अ. क्र. | जिल्हा | ०१ सप्टेंबर रोजी प्रतीक्षासूची वरील प्रलंबित उमेदवारांची संख्या | मागील ६ महिन्यात नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची संख्या | ०१ मार्च रोजी प्रतिक्षासूचीवरील प्रलंबित उमेदवारांची संख्या | ||||||
गट-क | गट-ड | एकूण | गट-क | गट-ड | एकूण | गट-क | गट-ड | एकूण | ||
1 |
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know