गौण खनिज वापर मार्गदर्शक तत्त्वे
  
  
    गौण खनिज वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
    शेततळी, तलाव, पाझर तलाव, बंधारे व गाव तलाव खोलीकरण बाबत
    १. शासन निर्णयाचा उद्देश
    
      - शेतकरी, कुम्हार व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शेततळी, पाझर तलाव, नाले, बंधारे आदींच्या खोलीकरणाद्वारे निघणाऱ्या माती, गाळ, रेती यांचा विनाशुल्क उपयोग करता यावा.
 
      - मातोश्री ग्राम समृद्धी योजना, घरकुल, विहीर बांधकामासाठी आवश्यक गौण खनिज उपलब्ध करून देणे.
 
    
    २. परवानगी व शुल्क बाबत
    
      - खोलीकरणातील गौण खनिजाचा वापर विनाशुल्क व स्वामित्वधिकाराशिवाय करता येतो.
 
      - शासन व पंचायत राज संस्थांच्या कामांसाठी हे खनिज अंदाजपत्रकात समाविष्ट असावे व कंत्राटदाराकडून शुल्क वसूल झालेला असावा.
 
      - परवानगी देणारा अधिकारी – तालुक्याचा तहसीलदार.
 
    
    ३. पात्र लाभार्थी
    
      - शेतकरी स्वतःच्या शेततळी / विहिरीसाठी.
 
      - घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी – ५ ब्रास पर्यंत माती.
 
      - मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतील शेत / पाणंद रस्ते कामे.
 
      - ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे सार्वजनिक बांधकाम प्रकल्प.
 
    
    ४. आवश्यक कार्यवाही
    
      - तहसीलदारांनी खातरजमा करावी की सरकारी कामासाठी आवश्यक रॉयल्टी आधीच वसूल करण्यात आली आहे.
 
      - संबंधित कंत्राटदाराकडून रॉयल्टी वसूल केली नसल्यास जबाबदारी तहसीलदारांची राहील.
 
    
    ५. शासन निर्णयाची संपूर्ण प्रत
    सरकारी संकेतस्थळावरील शासन निर्णय डाउनलोड करा (PDF)
   
   
 
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know