YogiPWD

गट-अ निवडश्रेणी वेतनस्तर मार्गदर्शक

गट-अ निवडश्रेणी वेतनस्तर मार्गदर्शक

गट-अ निवडश्रेणी वेतनस्तरासाठी मार्गदर्शक

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. २८ मार्च २०२३

१. निवडश्रेणी वेतनस्तराची आवश्यकता

  • एस-२० व त्यापुढील वेतनस्तरातील संवर्गांच्या पदोन्नतीतील अडथळे दूर करण्यासाठी निवडश्रेणी लागू करण्यात आली आहे.
  • राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ नुसार सुधारित वेतनस्तर स्वीकारण्यात आले.

२. निवडश्रेणी वेतनस्तराचे तपशील

अ.क्र. पूर्वीचा वेतनस्तर नवीन निवडश्रेणी वेतनस्तर
1एस-20: ₹56100-177500एस-23: ₹67700-208700
एस-21: ₹57100-180800
एस-22: ₹60000-190800
2एस-23: ₹67700-208700एस-25: ₹78800-209200
एस-24: ₹71100-211900
3एस-25: ₹78800-209200एस-27: ₹118500-214100
एस-26: ₹82200-211500

३. लागू करण्याचे निकष

  • निवडश्रेणी वेतनस्तर मंजूर करण्याचे प्रमाण संबंधित संवर्गातील २५% पदांच्या मर्यादेत असेल.
  • एस-२० किंवा त्यावरील वेतनस्तर असलेल्या संवर्गांसाठीच लागू.
  • मंजूर पदसंख्या किमान ४ हवी.
  • असलेल्या पदांमध्ये रिक्तता निर्माण होताच, सेवाज्येष्ठतेनुसार निवडश्रेणी लागू करावी.

४. कार्यपद्धती आणि अटी

  • निवडश्रेणी वेतनस्तर मंजुरीसाठी पदोन्नतीसाठीच्या कार्यपद्धती व अटींचा अवलंब करावा (संदर्भ क्र. २ च्या आदेशानुसार).
  • निवडश्रेणी ही कोणत्याही पदाच्या वेतनस्तरापेक्षा जास्त नसावी.
  • नियुक्तीची अंमलबजावणी दिनांक २८ मार्च २०२३ पासून प्रभावी आहे.

५. इतर सूचनांची अंमलबजावणी

  • या आदेशानुसार निवडश्रेणी मंजुरीचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत.
  • सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना हे शासन निर्णय कळवावे.

Post a Comment

0 Comments